बायको, मुलगा की अन्य; अजितदादा राज्यसभेवर कोणाला पाठवणार?

Ajit Pawar l लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय गणित पूर्णपणे बदललेली दिसत आहेत. या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी पक्षामध्ये अजित पवार गट आणि शरद पवार गट अशी दोन गट तयार झाले. यावेळी लोकसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार गटाला 10 पैकी 8 जागांवर विजय मिळाला आहे, तर अजित पवार गटाला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस बाकी :

अशातच आता राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस बाकी आहे. मात्र अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार गट) उमेदवार ठरलेला नाही. प्रफुल पटेल यांची राज्यसभेची जागा रिक्त झालेली आहे. या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेवरुन उमेदवारी मिळण्यासाठी सध्या बाबा सिद्दिकी, समीर भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे हे इच्छूक आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका गटाचं सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवून थेट त्यांना राज्यमंत्रीपद द्या अशी मागणी जोर धरत आहे.

Ajit Pawar l सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवा; कार्यकर्त्यांची मागणी :

मात्र आता राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे केवळ उद्याचा दिवस बाकी आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर उमेदवार ठरवावा लागणार आहे. त्यामुळे राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आता कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी भरण्यासाठी उद्याचा म्हणजेच 13 जून हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज दिवसभरात राष्ट्रवादीच्या उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आग्रह धरला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या वाढीसाठी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देऊन त्यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद द्यावे, अशी मागणी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यामुळे आता अजितदादा सुनेत्रा पवार यांना संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवणार का? याकडे अवघ्या महाराष्ट्राच्या नजरा लागल्या आहेत.

News Title – Rajya Sabha Election 2024

महत्त्वाच्या बातम्या-

आज रंगणार भारत विरुद्ध अमेरिका थरार; कोण वरचढ ठरणार?

पंकजाताईंचा पराभव समर्थकांच्या जिव्हारी लागला; बीडमध्ये अजूनही घडतंय बरचं काही

मनोज जरांगेंची प्रकृती ढासळली! रात्री अडीच वाजता सलाईन लावली

या राशीच्या व्यक्तींनी नवीन गुंतवणूक सावधानतेने करावी!

‘बजरंग सोनवणेंचा अजितदादांना फोन’, अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ