बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Rajyasabha Election | भाजपला मोठा झटका, भाजप आमदाराचं काँग्रेसला मतदान

मुंबई | देशात चार राज्यांमध्ये राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान होत आहे. विजयासाठी सर्वच राजकीय पक्षांनी ताकद लावली आहे. महाराष्ट्रामध्ये 9, राजस्थान 4, कर्नाटक 4 आणि हरियाणामध्ये 2 जागांसाठी मतदान होत आहे. त्यातच आता राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये फुट पडल्याची माहिती समोर येत आहे. राजस्थानातील भाजप आमदार शोभाराणी कुशवाह यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मत दिल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

उद्योगपती सुभाष चंद्रा यांनी भाजपच्या पाठिंब्याने राजस्थानमधून उमेदवारी दाखल केली होती. शोभाराणी यांचं मत नाकारल्याने  सुभाष चंद्रा यांना विजयी होणं दुरापास्त आहे. भाजप आमदार शोभाराणी कुशावह यांनी काँग्रेस उमेदवार प्रमोद तिवारी यांना मत दिलं आहे. तसेच घनश्याम तिवारी यांना जास्त मते मिळाल्याची माहिती देखील समोर येत आहे.

कर्नाटकमध्येही क्रॉस व्होटिंग झालं आहे. मी काँग्रेसला मत दिलं आहे. कारण मला तो पक्ष पसंत आहे, असं श्रीनिवास गौडा यांनी सांगितलं. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी यांनी दावा केला आहे की, जिंकण्यासाठी भाजप काँग्रेसला मदत मागत होते. सी.टी रवी हे काँग्रेसचे महासचिव आहे. मग ते काँग्रेसच्या कार्यालयात कसे गेले?, असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, राजस्थानातील भाजप आमदार शोभाराणी पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी नसल्याची माहिती आहे. शोभाराणी यांच्यासोबत कौलाश चंद मीना यांनी क्रॉस व्होटिंग केलं आहे. त्यातच राजस्थानातील काँग्रेसचे तीनही उमेदवार जिंकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याठिकाणी मुकुल वासनिक, प्रमोद तिवारी आणि रणदीप सुरजेवाला हे उमेदवार आहेत.

थोडक्यात बातम्या- 

President Election | राष्ट्रपतींना महिन्याला मिळतो ‘इतका’ पगार

एकनाथ खडसेंचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! दिल्ली पोलिसांचा असदुद्दीन ओवैसींना दणका

‘…तर आम्ही पण बांगड्या घातल्या नाहीत’; उदयनराजेंचा संजय राऊतांना इशारा

शिवसेनेच्या आमदाराची पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More