बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपचे खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर??

पुणे | भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची धक्कादायक अशी माहिती समजत आहे. राष्ट्रवादीच्या जळगाव येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यात ते प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला निमंत्रण दिल्याचं संजय काकडे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे संजय काकडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी काकडेंची अपेक्षा आहे.  मात्र काकडेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्याऐवजी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उदयनराजे यांचं भाजपसाठी काय योगदान आहे? असा सवाल करत काकडे यांनी उदयनराजेेंना उमेदवारी देण्यावर आक्षेप घेतला होता.

ट्रेंडिंग बातम्या-

‘वेल्हा’ तालुक्यास राजगड नाव द्या- सुप्रिया सुळे

असुराचा वध करायला महाराष्ट्रातील रणरागिणी मागे हटणार नाही- रूपाली चाकणकर

महत्वाच्या बातम्या-

शिवसेनेच्या हिंदुत्वाची परिक्षा!; सावरकरांच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक

राज्यातील 305 शाळा बंद करण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय

शिवस्मारकाच्या कामामध्ये गैरव्यवहार?; महाविकास आघाडीकडून मोठा खुलासा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More