भाजपचं मोठं सरप्राईज; राज्यसभेसाठी ‘या’ 3 उमेदवारांची घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भाजपकडून (Bjp) राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपने एकूण तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून भाजपात (Bjp) दाखल झालेलेल नेते अशोक चव्हाण, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे. तसेच अजित गोपछडे यांना सुद्धा भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपकडून ‘या’ नेत्यांना राज्यसभेची संधी

अजित गोपछडे हे विदर्भातील भाजपचे (Bjp) जुने कार्यकर्ते आहेत. ते अनेक वर्षांपासून भाजपात कार्यरत आहेत. अखेर त्यांना पक्षाकडून राज्यसभेच्या उमेदवारीचं बक्षीस मिळालं आहे.

मेधा कुलकर्णी या पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार आहेत. त्या दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. पण गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं. त्यांच्याऐवजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना संधी देण्यात आली होती. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांना डावलल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना ब्राह्मण समाजात होती. त्यामुळे पक्षाने त्यांना राज्यसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश दिले होते.

Bjp | 27 फेब्रुवारीला होणार निवडणूक

राज्यातून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. परंतु या तिघांपैकी कोणाचं नाव आलं नाही.

दरम्यान, देशातील 15 राज्यांतील 56 जागांवर ही निवडणूक होणार आहे. ही निवडणूक 27 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तसेच 29 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“स्वतःची औकात ओळख, अंथरुणावर पडून…”; नारायण राणेंचा जरांगे पाटलांना इशारा

संजय राऊतांबाबत ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा!

हार्दिक पांड्याची राजकारणात एन्ट्री?, अमित शहांसोबतचा फोटो व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या; धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह

दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वे विभागात होणार बंपर भरती