महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ही 2 नावं निश्चित??

Loading...

मुंबई | येत्या एप्रिल महिन्यांत महाराष्ट्रातील 19 राज्यसभा खासदारांपैकी 7 खासदारांची मुदत संपतीये. त्यापैकी 4 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत. त्यात 2 जागा राष्ट्रवादीच्या वाटेला येणार आहेत. या सात जागांसाठी येत्या 26 मार्च रोजी निवडणूक होणार आहे.

राष्ट्रवादीकडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांचं नाव याअगोदरच निश्चित आहे. तर दुसऱ्या जागेवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी मंत्री फौजिया खान यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातीये.

राष्ट्रवादीकडून मागील वेळी माजीद मेनन यांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाली होती. परंतु, यावेळी मात्र या जागेवर महिलेला संधी दिली जाणार असल्याची माहिती कळतीये.

दरम्यान, भाजपमध्येही राज्यसभेच्या उमेदवारीवरून चुरस असल्याचं पाहायला मिळतंय. भाजपकडून रामदास आठवले यांचं नाव निश्चित झालं असल्याने दुसरा उमेदवार कोण असेल याबाबत वेगवेगळे तर्क लावले जाऊ लागले आहेत. भाजपकडून उदयनराजे भोसले आणि संजय काकडे ही नावं चर्चेत आहेत. त्यामुळे कुणाला संधी मिळते हे पाहावं लागेल.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या- 

नगरसेवक पद रद्द केल्यानंतर श्रीपाद छिंदमची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

सर्वसामान्यांप्रमाणे मंत्री बच्चू कडूंनी केला लोकलनं प्रवास!

महत्वाच्या बातम्या- 

“मुस्लिमद्वेषातून देवेंद्र फडणवीसांचा आरक्षणाला विरोध”

“शिवसेनेनं तत्व बाजूला ठेऊन काय काय मॅनेज केलंय हे जाहीर करावं”

सरकारी कर्मचाऱ्यांचा पाच दिवसांचा आठवडा रद्द करा; उच्च न्यायालयात याचिका दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या