बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

वडिल धनंजय महाडिकांच्या विजयानंतर लेकाला अश्रू अनावर, सर्वांसमोर बाबांना मारली कडाडून मिठी

मुंबई | अखेर अनेक नाट्यमय घडामोडीनंतर राज्यसभेचा (RajyaSabha Election) निकाल जाहीर करण्यात आला. तब्बल नऊ तासाच्या प्रतिक्षेनंतर निकाल जाहीर झाला. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी विजयी झाले आहेत. भाजपचे पियुष गोयल हे देखील विजयी झाले आहेत.

राज्यसभेच्या साहव्या जागोसाठी कोल्हापुरचे दोन मल्ल मैदानात उतरले होते. कोल्हापुरचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक विरुद्ध कोल्हापुरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार अशी ही रंजक आणि अटीतटीची लढत पहायला मिळाली.

या निवडणुकीत कोल्हापुरचे धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. धनंजय महाडिक हे विजयी झाले आहेत. हा विजय धनंजय महाडिक यांच्या आई आणि पत्नीने गुलाल उधळून साजरा केला. कोल्हापुरतही धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

यावेळी विधानभवनात एक भावूक क्षण पहायला मिळाला. धनंजय महाडिक यांचा मुलगा क्रिश महाडिक यांनी भावूक होत वडिलांना मिठ्ठी मारली. चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त कोल्हापुरचा एक मल्ल भेट दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“बरंच काही शरद पवारसाहेबांकडून शिकण्यासारखं आहे” 

देवेंद्र फडणवीसांचं एकच वक्तव्य, संजय राऊतांच्या दुखऱ्या जखमेवर ठेवलं बोट 

…तर संजय राऊतांचा पराभव झाला असता; या पोस्टनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ 

चक्क शरद पवार यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक, म्हणाले… 

Rajyasabha Election Result | तिन्ही उमेदवार विजयी होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More