मुहुर्त ट्रेडिंगमध्ये राकेश झुनझुनवालांनी तासाभरातच कमावले ‘इतके’ कोटी
मुंबई | लक्ष्मीपूजनाच्या मुहुर्तावर शेअर बाजाराला सुट्टी असते. पण मुहुर्ताच्या ट्रेडिंगसाठी फक्त तास ट्रेडिंग सुरू असतं. शेअर बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारापैकी एक असणारे राकेश झुनझुनवाला यांनी या एक तासाच्या मुहुर्त ट्रेडिंग सेशनमध्ये कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.
झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओतील स्टॉकमधून त्यांनी तब्बल 101 कोटींची कमाई केली असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे. झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील इंडियन हॉटेल्स स्टॉकमध्ये यंदाच्या मुहुर्त ट्रेडिंगमध्ये 6 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. त्यांच्याकडे असलेल्या या 507.70 कोटींच्या शेअरची किंमत 31.13 कोटींनी वाढली.
झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओत असलेल्या टाटा मोटर्सच्या शेअरची किंमतही या सेशनदरम्यान वाढली. झुनझुनवालांकडे टाटा मोटर्सचे 3.67 कोटी शेअर आहेत. मुहुर्त ट्रेडिंग दरम्यान याची किंमत 17.82 कोटींनी वाढून 1800 कोटी इतकी झाली. तर झुनझुनवालांकडे असलेल्या क्रिसील या 1123 कोटी रूपयांच्या शेअरची किंमत वाढून 1144 कोटी रूपये झाली.
झुनझुनवाला यांना डेल्टा कॉर्प कंपनीच्या शेअरमधुन 12.6 कोटींचा तर एस्कॉर्ट्स कंपनीच्या शेअर मधुन 18.11 कोटी रूपयांचा फायदा झाला आहे. मुहुर्ताच्या वेळची गुंतवणुक शुभ मानली जाते त्यामुळे अनेक गुंतवणूकदार या दिवशी गुंतवणूक करतात. तर यंदाचं मुहुर्त ट्रेडिंग सेशन झुनझुनवालांसाठी बंपर कमाई सेशन ठरलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांना पेट्रोल-डिझलचे दर कमी करायला सांगावेत”
आर्यन खान प्रकरणाचा नव्याने तपास करणारे संजय सिंह कोण आहेत?, जाणून घ्या
“नरेंद्र मोदी यांना हरवणं शिवसेना किंवा शरद पवारांचं काम नाही”
समीर वानखेडे नाही तर ‘हे’ अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास
मुंबईच्या कोरोना आकडेवारीत चढउतार सुरूच, जाणून घ्या आजची आकडेवारी
Comments are closed.