बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

झुनझुनवालांसाठी ‘हा’ शेअर ठरला मल्टिबॅगर, 3 दिवसात कमावले 310 कोटी

मुंबई | भारताचे ‘वॉरेन बॅफेट’ म्हणून शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांची ओळख आहे. झुनझुनवाला यांनी नाझारा टेक, टायटान कंपनी आणि टाटा मोटर्स सारख्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यामुळे गेल्या काही काळात झुनझुनवाला यांच्या संपत्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे.

1985 साली कॉलेजपासून राकेश झुनझुनवालांनी ट्रेडिंगला सुरूवात केली. 6 ऑक्टोबर 2021 रोजी टाटा मोटर्सच्या शेअरची किंमत 365.60 रूपये इतकी होती. जी किंमत तीन सत्रामध्ये वाढून 417.80  झाल्यामुळे टाटा मोटर्सचे शेअर अवघ्या 3 दिवसात 25 टक्क्यांनी वाढले. टाटा मोटार्सच्या या शेअर्समुळे राकेश झुनझुनवाला यांना 310 कोटींचा नफा झाला. सोमवारी बीएसईवर 7.39 टक्क्यांच्या वाढीसह तो 411.25 रूपयांवर व्यवहार करत होता. त्यावेळी दुसरीकडे टाटा मोटर्सचे डीव्हीडीचे शेअर 5 टक्क्यापेक्षा अधिक वाढीसह 201.10 रूपयांवर बंद झाले.

राकेश झुनझुनवाला यांच्याकडे जून 2021 च्या तिमाहीत आतापर्यंत 3,77,50,000 शेअर्स होते, ते टाटा मोटर्स कंपनीच्या हिस्साच्या 1.14 इतके आहेत. याअगोदर मार्च 2021 च्या तिमाहीत राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 4,27,50,000 इतके शेअर्स होते. मात्र जूनच्या तिमाहीत झुनझुनवाला यांचा टाटा मोटर्समधील हिस्सा कमी झाला आहे.

दरम्यान, अलिकडेच राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. दुसरीकडे राकेश झुनझुनवाला यांच्या आकासा एअरलाईन्सला नुकतंच केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळालं आहे. पुढच्या वर्षी आकासा एअरलाईन्सची विमानसेवा नागरिकांसाठी सुरू करण्यात येईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…त्याआधीच अजित पवारांनी आरक्षण रद्द केलं’; गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

“शिवसेना निवडणुकीसाठी अशा पद्धतीनं पैसा गोळा करते”; मनसेचा खळबळजनक आरोप

देश अंधारात जाण्याची भीती!; राज्य सरकारची मोदींवर जोरदार टीका

सुसाट सुटणार गाड्या… महामार्गावरील ‘हा’ नियम लवकरच बदलणार!

रवी राणांची आमदारकी जाणार?, रवी राणा म्हणतात…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More