बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हे सरकार नसून दरोडेखोरांची टोळी आहे, यांच्यापासून देशाला वाचवावं लागेल”

नवी दिल्ली | केंद्रात कोणतंही सरकार नाही. कंपन्या सरकार चालवत आहेत. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी कृषी कायदे आणले आहेत. ही दरोडेखोरांची टोळी आहे. त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करावा लागेल आणि देशालाही वाचवावं लागेल, अशी बोचरी टीका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदी सरकारवर केली आहे.

राकेश टिकैत यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तौमर यांच्या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

केंद्र सरकार स्वतः आगीत तेल टाकतं आणि नामानिराळे होऊन जनतेनेच आग लावल्याचा दोषारोप करतं. हे निवडणुका असेच जिंकत नाहीत, ते काहीही करतात, असं म्हणत टिकैत यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांना कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही. पोलिसांचे बॅरिकेड्स तोडा. आज इथे बॅरिकेड्स तोडले तर उद्या दिल्लीतील तोडू शकाल. ज्यांना भीती वाटते त्यांनी येऊ नका. हे तर फक्त 3 कायदे आहेत. गप्प बसले तर आणखी 40 कायदे येतील. सरकार चर्चा करण्यापासून पळ काढत आहे, असं राकेश टिकैत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

मुलाच्या नाकातून येणारा वासावर सर्जरी केल्यानंतर डाॅक्टरांना देखील बसला धक्का!

तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत पोलिसांनी केलं धक्कादायक कृत्य!

#Corona पुण्यात आजही कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यातही अंश:त लाॅकडाऊन; जाणून घ्या!

“महाविकास आघाडी सरकारने मांडलेला अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा सुकाळ, तरतुदींचा दुष्काळ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More