बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तोपर्यंत घरी जाणार नाही’; नरेंद्र मोदींच्या निर्णयानंतर आंदोलक शेतकरी ठाम

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिन कृषी कायदे मागे घेतले असल्याची घोषणा केली. हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे होते. आम्ही चांगली नियत ठेऊनच हे कायदे आणले पण शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आम्ही कमी पडलो, असं म्हणत हे तीन कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली.

तर कृषी कायदे मागे घेण्यात आले, शेतकऱ्यांनी आता आंदोलन करू नये, आपापल्या घरी आणि शेतात परतावे, असं आवाहनही पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना केलं. पण आता प्रश्न हा उपस्थित होतो की केंद्राच्या या निर्णयानंर शेतकरी आंदोलन खरंच संपणार का? या प्रश्नावर भारतीय किसान युनीयनचे प्रवक्ते आणि शेतकरी आंदोलनातील मुख्य नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आंदोलन सध्याच परत घेणार नाही. आंदोलन तोपर्यंत सुरूच राहाणार जोपर्यंत कृषी कायदे संसदेमध्ये रद्द होत नाहीत, अशी प्रतिक्रिया राकेश टिकैत यांनी दिली आहे. संसदेत ज्या दिवशी हे कायदे रद्द होतील त्या दिवसाची आम्ही वाट पाहू, असंही राकेश टिकैत म्हणाले आहेत. त्यामुळे कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय झाला असला तरी शेतकरी आंदोलन इतक्यात संपण्याची चिन्ह सध्या नाहीत.

दरम्यान, आज प्रकाशपर्व आहे, ही कोणाला दोष देण्याची वेळ नाही, आम्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, असं पंतप्रधान मोदी आज म्हणाले. तर या महिन्याच्या अखेरपर्यंत संसदेच्या अधिवेशनात कायदे रिपिल करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. तर संसदेत कायदे रद्द होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

“पवार म्हणजे फक्त तडफड, पवारांना कुठेच जम बसवता आला नाही”

‘आम्हीच कमी पडलो’, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली देशाची माफी

मोदी सरकार अखेर झुकलं; तीन कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

मोठी बातमी! एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणी वाढल्या

“स्तनांना कपड्यांवरुन स्पर्श असला तरी तो लैंगिक अत्याचारच”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More