बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘केंद्र सरकार फक्त बोलतं, आता 10 वर्ष लागली तरी…’; राकेश टिकैत आक्रमक

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात संयुक्त किसान मोर्चोनं आज भारत बंदची हाक दिली आहे.  देशभरातून राजकीय पक्ष आणि संघटनांनी मोठ्या प्रमाणात भारत बंदला पाठिंबा दिला आहे. या बंदमध्ये शेतकऱ्यांनी देशातील अनेक महामार्ग चक्काजाम केले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आम्ही पुढील दहा वर्षही आंदोलन करण्यास तयार आहोत, असा इशाराही केंद्र सरकारला दिला आहे.

कृषी कायदे हटवावे आणि शेतीमालाला किमान हमीभाव मागणीच्या कायद्यासाठी शेतकरी गेल्या 10 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. केंद्रीय कृषी मंत्री चर्चेसाठी आम्हाला आमंत्रण देत आहेत. परंतु आम्हांला कृषी मंत्र्यांना विचारायचं आहे की, सरकाराने आम्हाला वेळ आणि ठिकाण सांगावं. परंतु केंद्र सरकार तसं करणार नाही, ते फक्त बोलतात. परंतु काही करत नाही. सरकारने आम्हाला बिनशर्त चर्चेसाठी बोलवावं. पुढील 10 वर्ष लागले तरी आम्ही आमच्या मागण्या मागे घेणार नाहीत, असं राकेश टिकैत यांनी माध्यामांशी बोलताना सांगितलं.

भारत बंदला 500 पेक्षाहून अधिक शेतकरी संघटना, 15 कामगार संघटना, त्याचबरोबर राजकीय पक्ष आणि  देशातील 6 राज्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या बंदमध्ये शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेस रोखली आहे. दिल्ली आणि युपीमधील गाझीपूर सीमादेखील बंद केली आहे.

दरम्यान,  भारत बंदमध्ये रूग्णवाहिका, डॉक्टर, आणि आपत्कालिन सेवांशी संबंधित इतर लोकांना थांबविले जाणार नसल्याचं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

थोडक्यात बातम्या-

सोन्याच्या दरामध्ये आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

आईच्या मृत्यूनंतर मुलांनी वडिलांसोबत मिळून बनवलं आईचं मंदिर!

“भरकटलेली वक्तव्य करणाऱ्या संजय राऊतांना नेमकं कुठं जायचं आहे?”

“भाजपने मनसेशी युती करावी, त्यांना निवडणुकीत फायदा होईल”

पायातून रक्त वाहत असताना देखील CSKचा ‘हा’ खेळाडू खेळतच राहिला, फोटो व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More