Top News देश

मोदी-योगी सरकारला नडतोय एकटा नेता; म्हणाला, “गोळ्या घाला पण मागे हटणार नाही”

नवी दिल्ली | गाझीपूरमध्ये आंदोलन पोलिसांनी संपवलं होतं तोच भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी आंदोलनस्थळावरुन हटणार नसल्याचं जाहीर केलं. त्यांना रडू कोसळलं आणि चमत्कार घडला. आंदोलनस्थळावरुन निघालेले शेतकरी तर पुन्हा परतलेच पण हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून टिकैत यांना पाठिंबा देण्यासाठी शेतकरी एका रात्रीत गाझीपूरला पोहोचले.

देशातील शेतकऱ्यांविरोधात सर्वात मोठं षडयंत्र केलं जात आहे. जोपर्यंत हे कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत मी मागे हटणार नाही, असं राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे. शेतकरी कायदे मागे घेतले नाहीत तर मी आत्महत्या करेन, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलन गुंडाळण्यात सरकारला यश येईल, असं मानलं जात होतं. उत्तर प्रदेश पोलिसांनी शेतकऱ्यांना आंदोलन समाप्त करण्यासाठी अल्टिमेटम देखील दिलं होतं.

पोलिसांच्या अल्टिमेटमनंतर अनेक शेतकऱ्यांनी आपले तंबू हलवण्यास सुरुवात केली होती, आंदोलन कोणत्याही क्षणी समाप्त होईल, अशी शक्यता होती. मात्र राकेश टिकैत यांच्या भूमिकेनं आता या आंदोलनात पुन्हा प्राण आला आहे.

थोडक्यात बातम्या-

शेतकरी नेत्याच्या अश्रूंनी केली कमाल; एका रात्रीत शेतकरी आंदोलन पुन्हा पेटलं!

…अन् शेतकरी नेत्यानं त्या व्यक्तीच्या जोरात कानाखाली ओढली, पाहा Video

रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील वादही मिटणार!

…शेवटी लेकाने पालिका मुख्यालायत आणलं; अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक

‘हा’ राजकीय आणि सांस्कृतिक दहशतवाद, तो संपवावाच लागेल- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या