देश

“कृषी कायदे परत घेतले नाही, तर मी आत्महत्या करेन”

नवी दिल्ली | शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी अटकेच्या नावाखाली आपल्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप केलाय.

जीव देईन, पण इथून हटणार नाही. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही. कृषी कायदे मागे घेतले नाही, तर मी आत्महत्या करेन, असं राकेश टिकैत यांनी म्हटलंय.

पोलीस दडपशाही करत आहेत. गावांमधून आलेल्या शेतकऱ्यांनी घाबरु नये. नवे कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही. ज्या मागणीसाठी इथं आलो आहोत ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. शेतकरी आंदोलन सुरुच राहिल, असं राकेश टिकैत म्हणाले.

सरकार शेतकऱ्यांवरही लाठीचार्ज करेल. हे षडयंत्र आहे. याचा तपास झाल्यास सर्व उघड होईल. लोक शेतकऱ्यांना पळून जाण्यास सांगत आहेत. मी कुठेही जाणार नाही, इथंच राहणार आहे. आमचं पाणी, वीज सर्व बंद करण्यात आलंय. त्यांनी आमचं पाणी बंद केलंय, पण आम्ही आमच्या गावावरुन पाणी घेऊन येऊ. जिल्हा प्रशासनाने जबरदस्तीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला, तर मी फाशी घेऊन आत्महत्या करेल, असं टिकैत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

आता फारकाळ विरोधी पक्षात राहायचं नाही- देवेंद्र फडणवीस

भाजप नेत्याचा महिलेसोबत अश्लील डान्स; व्हिडीओ व्हायरल!

“देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले कृष्ण आहेत त्यांनी आता सुदर्शन काढावं”

“शरद पवारांनी दिलेली वाट तात्पुरती, कॉंग्रेसला कोणीही संपवू शकत नाही”

“अंगात नुसतं विदर्भाचं रक्त असून चालणार नाही, प्रामाणिकही राहा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या