बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोनाचा प्रसार वाढला”

नवी दिल्ली | केंद्र सकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन चालू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टीकैत या आंदोलनाचं नेतृत्त्व करत आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन आक्रमक करण्यासाठी टीकैत पुन्हा सक्रीय झालेले पहायला मिळाले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची भेट घेतली.

या भेटीतशेतकरी आंदोलनाचं स्वरुप, बंगालमधल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या विषयांवर चर्चा झाल्याचं समजत आहे. त्यानंतर टीकैत यांनी माध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोनाचा अधिक प्रमाणात पसरत असल्याचा आरोप राकेश टीकैत यांनी केला.

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या कालावधीत कोरोनाचा भरपूर फैलाव झाला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या रॅली, बैठका झाल्या आणि त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढल्याचं राकेश टीकैत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शेतकरी आंदोलनामुळे कोरोनाचा फैलाव वाढतोय असं वाटत नाही का, असा प्रश्न टीकैत यांना विचारण्यात आला. तेव्हा आम्ही मोठी मिटींग घेतली नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा प्रश्नच नाही. आम्ही सगळेजण करोना नियमांचं पालन करुन आंदोलन करत असल्याचं टीकैत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

बाबो! सापाच्या हल्ल्यात मांजराने हवेत घेतलेली झेप पाहून तुम्हीही व्हाल थक्क, पाहा व्हिडीओ

पाचवीतील मुलीनं सरन्यायाधीशांना लिहिलं पत्र, म्हणाली….

“आता ठाकरे सरकार मुंबईतील पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल”

मोठी बातमी! मुंबईसह राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More