नवी दिल्ली | आम्ही सरकारसोबत कुठल्याही प्रकारच्या दबावात बोलणार नाही. जेव्हा बरोबरचा प्लॅटफॉर्म असेल, तेव्हाच चर्चा होईल, असं शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणालेत.
चक्का जामनंतर दिल्ली-यूपी गाझीपूर बॉर्डरवर राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे.
आम्ही सरकारला कायदे मागे घेण्यासाठी 2 ऑक्टोबर ही तारीख दिली आहे. यानंतर आम्ही पुढील योजना आखू. मात्र सरकारने आमचं ऐकावं, असं राकेश टिकैत यांनी म्हटलंय.
पुढच्या आंदोलनात, ज्यांची मुलं सीमेवर अथवा पोलिसात आहेत, त्यांचे कुटुंबीय येथे असतील. त्यांचे वडिल त्यांचा फोटो घेऊन येथे बसतील. फोट केव्हा घेऊन यायचे हेही मी सांगेन, असं राकेश टिकैत म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
“राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये”
“कोरोनाचा कहर शमण्यासाठी सात वर्षे लागू शकतात”
‘महाराष्ट्रात चार उपमुख्यमंत्री करा’; बच्चू कडूंनी सांगितला फॉर्म्युला
शरद पवारांनी सचिन तेंडुलकरला दिला ‘हा’ महत्त्वाचा सल्ला
जॅकलिनने प्रियांका चोप्राचं जुहूमधील जुनं घर केलं खरेदी, किंमत वाचून आश्चर्यचकित व्हाल!