बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“होय, मी धमकी देतोय! भाजप नेते मंचावर आले तर एक एकाचे बक्कल्स काढले जातील”

नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या सात महिन्यांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. तरी देखील अद्याप केंद्र सरकारने यावर काही तोडगा काढलेला नाही. पंतप्रधान मोदींनी या कायद्यांनी शेतकऱ्याला फायदा होणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, शेतकरी आपलं आंदोलन मागे घेण्यास तयार नाहीत.

अशातच आज उत्तर प्रदेशमधील गाजीपूर सीमेवर आंदोलनातील शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीनंतर आता शेतकरी नेता राकेश टिकैत यांनी भाजप नेत्यांना एकप्रकारे धमकीच दिली आहे.  भाजप नेते किसान मोर्चाच्या मंचावर आले तर एक एकाचे बक्कल्स काढले जातील, अशी धमकीच राकेश टिकैत यांनी दिली आहे.

राकेश टिकैत म्हणाले की, होय मी धमकीच देत आहे. किसान मोर्चाच्या संपूर्ण प्रदेशात कुठेही भाजप नेत्यांना येऊ दिलं जाणार नाही. रस्त्यावर मंच असण्याचा अर्थ असा नाही की, कोणीही मंचावर येईल. जर यायचंच असेल तर भाजप सोडून इतर लोकांनी या. जे लोक कब्जा करण्याचा प्रयत्न करतील त्यांचे बक्कल्स काढले जातील.

दरम्यान, केंद्र सरकारने नव्यानं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप पहायला मिळत आहेत. जोपर्यंत केंद्र सरकार हे कायदे मागे घेत नाही. तोपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचं आंदोलनातील शेतकऱ्यांचं म्हणनं आहे. नव्या कृषी विधेयकांमुळे देशातील वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. यामुळे मोदी सरकार या कृषी कायद्यांबद्दल काय तोडगा काढणार? हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

“अजित पवार आणि अनिल परबांचे मनसुख हिरेन आणि स्फोटक प्रकरणातील वाझेशी संबंध”ो

“राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यासारखं वागत आहेत”‘

रणवीर सिंहचा नवीन लूक पाहून चाहते झाले सैराट, पाहा फोटो

आज सोनं तब्बल 460 रुपयांनी घसरलं, तर चांदी देखील उतरली; वाचा ताजे दर

कोरोनाकाळात ‘या’ शहरातील खासगी रुग्णालयाविरूध्द तब्बल 580 तक्रारी, 496 लागल्या निकाली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More