बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हिला कोणीतरी आवरा”, योगा व्हिडीओंमुळे राखी झाली ट्रोल

मुंबई | ‘बिग बाॅस 14’ फेम राखी सावंत सध्या तिच्या व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत असते. अनेक व्हिडीओमध्ये एखाद्या गाण्यातील मेन हिरोईनचा चेहरा स्वतःच्या चेहऱ्याशी बदलने, तर कधी विनोदी व्हिडीओ बनवून इन्स्टावर शेअर करणे, अशा प्रकारे राखी सर्वांचं मनोरंजन करत असते. अशातच राखीने बारीक होणं फारच मनावर घेतलं असून तिच्या योगा व्हिडीओमुळे ती आता ट्रोल होऊ लागली आहे.

बिग बाॅस नंतर राखी नियमीत जिमला जात आहे. अशातच तिच्या वर्कआऊटचा एक व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवरुन शेअर केला आहे. यामध्ये राखी प्रचंड मेहनत करत असल्याचं दिसून येत आहे. मात्र योगा करताना घालण्यात येणाऱ्या तिच्या कपड्यांवरुन या बाईला कोणीतरी आवरा अशी कमेंट एका यूझरने केली आहे. तरी राखीने यावर अद्याप काही उत्तर दिलेलं नाही.

काही दिवसांपुर्वी राखीने घरकाम करत असताना एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यादरम्यान, बिग बाॅसने तिला कामाची सवय लावली असल्याचं तिनं म्हटलं होतं. नुकतंच अभिनेत्री शेहनाझ गिलने तिचं वजन कमी केलं आहे. तिच्यानंतरच राखीने तिचं वजन कमी करण्याकडे प्रचंड लक्ष देणं सुरु केलं असल्याचं अनेक लोक म्हणत आहेत.

दरम्यान, राखी नेहमीच तिचे हटके व्हिडीओ शेअर करत असते. नुकतचं तिने तिचा नागीन रुपातला फोटो शेअर केला होता. याशिवाय मुंबईच्या रस्त्यांवर ती अनेकदा फिरताना दिसते. त्यामुळे ती सतत विविध कारणांमुळे चर्चेत राहते.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

थोडक्यात बातम्या-

“लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा”

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी केंद्र सरकारकडून ‘ही’ मोठी तयारी सुरु!

‘भारतीय संघातील ‘हे’ 2 खेळाडू न्यूझीलंडवर पडतील भारी’- डेव्हिड वॉर्नर

“आमची महानगरपालिका निवडणूकीची सगळी तयारी झाली आहे, लवकरच दौरे सुरू होतील”

सुशांतच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंकिताने शेअर केला आठवणीतील ‘हा’ भावनिक व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More