…अन् राखी रस्त्यावरच रडत बसली

मुंबई | हल्ली बाॅलिवूडमध्ये आदिल खान आणि राखी (Rakhi Sawant) याच्या वादाची चर्चा सुरु आहे. राखीनं कोणालाही न सांगता आदिल सोबत लग्न उरकलं. मीडियासमोर जेव्हा आदिल आणि राखीच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले तेव्हा तिचं लग्न सगळ्यांसमोर आलं.

त्यानंतर राखीला आदिल विषयीच्या अनेक गोष्टी कळू लागल्या आणि हा वाद कोर्टात गेला. राखीनं तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खान दुर्रानीवर (Adil Khan) गंभीर आरोप करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. सध्या त्याची सुणावणी कोर्टात सुरु आहे.

राखीनं आदीलवर खूप प्रेम केलं होतं, असं ती वारंवार सांगताना दिसत आहे. राखीचे रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ (Video) समोर येत आहेत. अशातच नुकताच राखीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये राखी रस्त्यावर बसून रडत असल्याचं दिसत आहे. त्यानं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं असं ती त्या व्हिडीओत बोलताना दिसत आहे.

या व्हिडीओत आदिलच्या गर्लफ्रेंडचा (girlfriend) ऑडिओ आणि व्हि़डीओ समोर आला आहे, असं म्हणत राखी पुन्हा रडत आहे. देव माझ्यावर कृपा करो. त्या मुलीनं माझं घर तोडलं. मला रस्त्यावर आणून सोडलं, असं देखील राखी रडत म्हणताना दिसत आहे.

तुम्ही हताश आहात का? असा प्रश्न विचारल्यानंतर मी हताश नसून मी गोंधळलेली आहे. मी हा विचार करत आहे की माझ्यासारख्या खंबीर मुलीला एकदा मुलगा धोका कसा देऊ शकतो. का माझं आयुष्य खराब केलंं?, असा सवाल देखील करताना राखी दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या