बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘टिप टिप बरसा पाणी’ गाण्यावर राखीने केला भर पावसात डान्स, व्हिडीओ व्हायरल

मुंबई | ‘बिग बाॅस 14’ फेम राखी सावंत सध्या तिच्या व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत असते. अनेक व्हिडीओंमध्ये एखाद्या गाण्यातील मेन हिरोईनचा चेहरा स्वतःच्या चेहराशी बदलने, तर कधी विनोदी व्हिडीओ बनवून इन्स्टावर शेअर करणे, अशा प्रकारे राखी सर्वांचं मनोरंजन करत आहे. अशातच राखीने पावसात नाचताना एक व्हिडीओ शेअर केला आहे.

संबंधित व्हिडीओमध्ये राखीने टिप टिप बरसा पाणी या गाण्यावर डान्स केला आहे.राखीचा हा भन्नाट डान्स नेटकऱ्यांसाठी चांगला मनोरंजक ठरला. काहींनी म्हटलं, ‘एन्टरटेन्मेंट क्वीन’ तर काहींना तिचा बिनधास्तपणाही आवडला. त्यामुळे सध्या राखी सोशल मीडियावर चांगलीच हीट ठरताना दिसत आहे.

काही दिवसांपुर्वी राखीने घरकाम करत असताना एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यादरम्यान, बिग बाॅसने तिला कामाची सवय लावली असल्याचं तिनं म्हटलं होतं. नुकतच अभिनेत्री शेहनाझ गिलने तिचं प्रचंड वजन कमी केलं आहे. तिच्यानंतरच राखीने तिचं वजन कमी करण्याकडे प्रचंड लक्ष देणं सुरु केलं असल्याचं अनेक लोक म्हणत आहेत.

दरम्यान, पावसात नाचतानाचा राखीचा व्हिडीओ विरल भैयानीने शेअर केला आहे. तसेच राखी नेहमीच तिचे हटके व्हिडीओ शेअर करत असते. नुकतचं तिने तिचा नागीन रुपातला फोटो शेअर केला होता. याशिवाय मुंबईच्या रस्त्यांवर ती अनेकदा फिरताना दिसते. त्यामुळे ती सतत विविध कारणांमुळे चर्चेत राहते.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


थोडक्यात बातम्या-

भुकेल्या हत्तीने चक्क हेलमेट खाल्लं, पाहा व्हिडीओ

एकवेळ सवलत मिळेल, पण वीजबिल माफ होणार नाही- नितीन राऊत

मालक शवासन करत असताना कुत्र्याला झाला गैरसमज, कुत्र्याने केलं अस काही की…, पाहा व्हिडीओ

भारतीय शास्त्रज्ञाची कमाल! 20 दिवसांत तयार केला खिशात बसणारा व्हेंटिलेटर

“हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More