राखीची तब्येत नाजूक, ‘या’ आजाराशी करतेय सामना?; एक्स नवऱ्याकडून खुलासा

Rakhi Sawant | बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सतत काही न काही कारणांमुळे चर्चेत राहत असते. काही दिवसांपूर्वी ती आपल्या रिलेशनशिप आणि घटस्फोटामुळे चर्चेत होती. अशात राखीच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. राखीला नेमकं काय झालंय, याबाबत वेगवेगळे अंदाज बांधण्यात आले.

आता राखीच्या हेल्थबद्दल तिच्या जवळच्या व्यक्तीने एक मोठी अपडेट दिली आहे. राखी सावंत हिचा एक्स पती रितेश याने महत्वाची माहिती दिली आहे. राखी कोणतेही नाटक करत नसून तिची तब्येत खरोखरच अत्यंत गंभीर आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून तिच्या छातीमध्ये त्रास होतो आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असल्याचं रितेश याने म्हटलं आहे.

राखी सावंतला कॅन्सर?

पुढे रितेश म्हणाला की,या कठीण प्रसंगी मी तिच्यासोबत आहे. राखीची तब्येत नाजूक असल्याचेही रितेशने सांगितले.राखीसाठी देवाकडे प्रार्थना करण्याची देखील विनंती रितेश याने केलीये. रितेशने राखी सावंतला कॅन्सर असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

डॉक्टरांकडून याला अद्याप दुजोरा मिळालेला नाहीये. मात्र, तिच्या बऱ्याच चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचे रिपोर्ट येणं अजुन बाकी असल्याची माहिती रितेशने दिली आहे. डॉक्टरांना राखी सावंतच्या (Rakhi Sawant ) गर्भाशयात ट्यूमर असल्याचं दिसून आलं. आता त्याची तपासणी डॉक्टर करत आहेत. अशी माहिती रितेश याने दिली आहे.मात्र, याबाबत अद्याप कोणताच खुलासा झालेला नाहीये.

पहिला नवरा रितेशकडून खुलासा

रितेश आणि राखी यांची भेट बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये झाली होती. इथून त्याच्यात मैत्री झाली आणि दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र, 2022 मध्ये शो संपताच दोघेही वेगळे झाले. रितेशनंतर राखीने (Rakhi Sawant ) आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केले होते.मात्र, लग्नाच्या काही महिन्यांनंतरच त्यांच्यात प्रचंड वाद झाले.

इतकंच नाही तर, राखीने आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप देखील केले होते. हेच नाही तर यांचा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहचला आणि आदिलला काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ देखील आली होती. आदिलनेही राखीवर बरेच आरोप केले होते. त्यामुळे राखी बरेच दिवस चर्चेत होती. आता राखीच्या आरोग्याबाबत चर्चा रंगते आहे.

News Title – Rakhi Sawant ex husband gives her health update

महत्त्वाच्या बातम्या-

कोवॅक्सिन लसीने चिंता वाढवली; नागरिकांमध्ये आढळतायेत हे गंभीर आजार

“आई-वडिलांच्या भांडणांमुळे शाळेत लाज..”; रणबीर कपूरने केला खुलासा

“मोदी फक्त गायीवर बोलतात महागाईवर बोलत नाहीत”, उद्धव ठाकरेंची मोदींवर बोचरी टीका

महाविकास आघाडीच्या नेत्यांबाबत शंभूराज देसाई यांचा मोठा गौप्यस्फोट!

…म्हणून T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचे वर्चस्व राहणार; सराव सामन्यांचं वेळापत्रक जाहीर