राखीला ड्रामेबाजी पडली महागात; महिला कुस्तीपटूने रिंगमध्ये उचलून आपटलं

राखीला ड्रामेबाजी पडली महागात; महिला कुस्तीपटूने रिंगमध्ये उचलून आपटलं

पंचकुला | बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत चर्चेत राहण्यासाठी नेहमीच काही ना काही करत असते. त्यात आता तिला एका महिला कुस्तीपटूचं चॅलेंज घेणं महागात पडलं आहे. 

हरियाणामधील पंचकुला येथे ‘कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल’कडून महिला कुस्तीपटूंची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा त्यातील विदेशी महिला कुस्तीपटू रोबेलने कुण्या भारतीय महिलेत दम असेल माझ्याशी लढावे, असं आव्हान दिलं. 

त्यावर राखीने ते स्वीकारलं. अाधी तु माझ्यासारखं नाचून दाखव, असं आव्हान राखीने रोबेलला दिलं. रोबेलनंही तिच्यासोबत डान्स करत आव्हान पुर्ण केलं. मात्र गाणं संपताच रोबेलनं राखीला हवेत उचलून रिंगमध्ये आपटलं. 

दरम्यान, सुरुवातीला कोणाला काहीच समजले नाही. मात्र थोड्या वेळाने सुरक्षारक्षकांनी रिंगमध्ये जाऊन राखीला उचलले आणि जवळच्या रुग्णालयात दाखलं केलं.

https://twitter.com/HatindersinghR/status/1061867486352527360

महत्त्वाच्या बातम्या-

-आता राज ठाकरे चक्क उत्तर भारतीयांच्या मंचावर जाणार!

-वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा आणखी एक पराभव; भारतीय महिलांचा भीम पराक्रम

-मंत्री असताना लाच घेतल्याचा आरोप; भाजपच्या बड्या नेत्याला अटक

-पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात नाशिकचे सुपूत्र शहीद

-केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं निधन

Google+ Linkedin