राखी सावंतने गुपचूप उरकलं लग्न, फोटो होतोय व्हायरल
मुंबई | अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या न कोणत्या गोष्टींमुळे चर्चेत असते. नुकताच मराठी बिग बाॅस सिझन चार मध्ये राखी दिसली होती. मराठी बिग बाॅस देखील तिनं चांगलंच गाजवलं आहे.
नुकताच बिग बाॅस मराठी सिझन संपला आहे. मात्र त्यानंतर लगेच राखीने तिच्या चाहत्यांना एक धक्का दिला आहे. राखीने तिचा बाॅयफ्रेड आदिल सोबत कोर्ट मॅरेज केलं आहे. दोघांनीही गुपचूप लग्न केलं आहे.
सोशल मीडियावर या दोघांचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत दोघांच्याही गळ्यात वरमाला दिसत आहे. तसेच हातात मॅरेज सर्टिफिकेट दिसत आहे. त्यांच्या या लग्नाविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
या फोटोनुसार फोटोत दिसणाऱ्या मॅरेज सर्टिफिकेटवर मे 2022 ची तारीख पहायला मिळाली आहे. या दोघांनी अधीच गूपचूप लग्न उरकलं का?, असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. राखीचा पूर्वीश्रमीचा बाॅयफ्रेंड रितेश याच्यासोबत राखीचं 2022 मध्ये ब्रेकअप झालं होतं.
याबद्दल राखीचा बायफ्रेंड आदिल याला विचारलं असता आपलं राखीशी लग्न झालं नसल्याचं तो म्हणाला. राखीचं लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असल्याचं पहायला मिळतं. राखी आणि आदिल यांची लव्हस्टोरी 2022 मध्ये सुरु झाली आहे. आदिल हा राखीपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
Comments are closed.