राखी सावंतची प्रकृती अत्यंत खालावली, जीवनमरणाचा संघर्ष?; जवळच्या व्यक्तीकडून अपडेट

Rakhi Sawant | बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत सतत काही न काही कारणांमुळे चर्चेत राहत असते. काही दिवसांपूर्वी ती आपल्या रिलेशनशिप आणि घटस्फोटामुळे चर्चेत होती. नेहमीच अजीब स्टाईलने ती चाहत्यांचं लक्ष वेधत असते. अशात राखीच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेत्रीची तब्येत अचानक बिघडली, त्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या या आजारपणामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अशात राखीच्या हेल्थबद्दल तिच्या जवळच्या व्यक्तीने एक मोठी अपडेट दिली आहे. राखी सावंत हिचा एक्स पती रितेश याने महत्वाची माहिती दिली आहे. राखी कोणतेही नाटक करत नसून तिची तब्येत खरोखरच अत्यंत गंभीर आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून तिच्या छातीमध्ये त्रास होतो आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असल्याचं रितेश याने म्हटलं आहे.

राखी सावंतची प्रकृती खालावली

पुढे रितेश म्हणाला की,या कठीण प्रसंगी मी तिच्यासोबत आहे. राखीची तब्येत नाजूक असल्याचेही रितेशने सांगितले.राखीसाठी देवाकडे प्रार्थना करण्याची देखील विनंती रितेश याने केलीये. राखी सावंत हिच्या बऱ्याच टेस्ट होणे अजून शिल्लक आहे. मात्र, राखी सावंत हिच्यावर नेमक्या कोणत्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत, हे अजूनही कळू शकले नाहीये.

राखीचे रुग्णालयातील फोटो देखील व्हायरल झाले होते. हे फोटो पाहून नेटकरी ती नाटक करत असल्याचं म्हणत होते. राखी सावंतने अनेकदा लोकांना फसवलं आहे. त्यामुळे आता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय यावर नेटकऱ्यांचा विश्वासच बसत नाहीये. मात्र, राखीच्या एक्स पतीने हेल्थबद्दल अपडेट दिल्यानंतर राखी (Rakhi Sawant ) खरोखरंच आजारी असल्याचं म्हटलं जातंय.

राखीच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

राखीने (Rakhi Sawant ) आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केले होते.मात्र, लग्नाच्या काही महिन्यांनंतरच त्यांच्यात प्रचंड वाद झाले. इतकंच नाही तर, राखीने आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप देखील केले होते. हेच नाही तर यांचा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहचला आणि आदिलला काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ देखील आली होती.

आदिलनेही राखीवर बरेच आरोप केले होते. त्यामुळे राखी बरेच दिवस चर्चेत होती. आता राखीच्या आरोग्याबाबत चर्चा रंगते आहे. रुग्णालयातील राखीचे फोटो पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत. ती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना चाहते करत आहेत.

News Title –  Rakhi Sawant Health Update

महत्त्वाच्या बातम्या-

केरळनंतर राज्यात मान्सून कधी दाखल होणार?; हवामान खात्याकडून मोठी अपडेट

क्रिकेटप्रेमींनो ‘या’ दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान हायव्होल्टेज लढत

मतदानाच्या आकडेवारीने आढळरावांचं टेंशन वाढवलं; कोल्हेंना फायदा होणार?

लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? श्रेयस तळपदेचं वक्तव्य चर्चेत

मौलवी उपचाराच्या नावाखाली करत होता बलात्कार, महिलेचा धक्कादायक दावा