बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ये मैं हूं, ये मेरा घर और ये मेरा पोछा है…’; राखीने शेअर केला बाथरूममधील व्हिडीओ

मुंबई | ‘बिग बाॅस 14’ या शोच्या टाॅप 5 मध्ये पोहोचलेल्या कंटेस्टंटमध्ये एक राखी सावंतसुद्धा होती. फिनालेपर्यंत पोहोचल्यावर राखीने 14 लाख रुपये घेऊन शो सोडला. या शो दरम्यान राखीने लोकांना प्रचंड हसवलं होत. शो नंतर राखी तीच्या आई जवळ परतली आणि शोमधून बाहेर आल्यानंतर सुद्धा राखी तीच्या सोशल मीडियाच्याद्वारे लोकांना हसवत आहे. मात्र सध्या राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

राखीने नुकताच सोशल मीडियावर घरकाम करताना तीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती झाडू मारणं, फरशी पुसणं, कपडे धुणं, भांडी घासणं अशी अनेक काम करत आहे. हे सर्व काम करत असताना तीने लोकांना बिग बाॅसच्या घराची आठवण करुन दिली आहे. एवढचं नाही सलमान सर तीला घरकाम करावं असं बिग बाॅसच्या घरात सांगत असल्याचं देखील तीनं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

राखीच्या मजेशीर व्हिडीओमध्ये तीनं म्हटल्याप्रमाणे बिग बाॅस आणि सलमानने तीला गृहिणी बनवून टाकलं आहे. तसेच तीला सर्व काम देखील शिकवलं आहे. मात्र बिग बाॅस संपल्यामुळे ती जणु वेडी झालीये आणि घरकाम करत असल्याचं तीनं म्हटलं आहे. एवढचं नाही तर राखीने या व्हिडीओमध्ये फरशी पुसताना ये मै हूँ, ये मेरा घर है और ये मेरा पोछा है और यहाँ पावरी नही हो रही है, यहाँ पोछा लग रहा है, घर साफ हो रहा हैं, असं ट्रेंडींग डायलाॅग मारला आहे.

दरम्यान, बिग बाॅस 14 मध्ये तीला सलमान खान आणि सोहेल खानमुळे काम मिळाल्याचं राखीनं एका मुलाखतीत सांगितलं होत. तसेच तीला इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असून तीला काम मागण्यात कसलीच लाज वाटत नाही असा मेसेज तीने सोहेल खानला केला होता, अशी माहिती देखील तीने दिली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

थोडक्यात बातम्या-

कॉमेडी किंग जॉनी लिव्हरचा मुलांसोबतचा व्हिडिओ व्हायरल, पाहा व्हिडिओ

18 नाही तर आता ‘इतक्या’ वर्षापर्यंत करावा लागणार मुलाचा सांभाळ; सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय

फारुख अब्दुल्लांच्या भन्नाट डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, पाहा व्हिडिओ

“श्रीराम बोले मै कहाँ बडा, मै तो बीजेपी के मॅनिफेस्टो मे पडा”

खाता खाता धाडकन पडला चिमुरडा, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही, पाहा व्हिडिओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More