बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ड्रामा क्वीन राखी सावंत बारीक होण्यासाठी करतीये प्रचंड मेहनत, पाहा व्हिडीओ

मुंबई | ‘बिग बाॅस 14’ फेम राखी सावंत सध्या तिच्या व्हिडीओमुळे प्रचंड चर्चेत असते. अनेक व्हिडीओंमध्ये एखाद्या गाण्यातील मेन हिरोईनचा चेहरा स्वतःच्या चेहराशी बदलने, तर कधी विनोदी व्हिडीओ बनवून इन्स्टावर शेअर करणे, अशा प्रकारे राखी सर्वांचं मनोरंजन करत आहे. अशातच राखीने बारीक होणं फारच मनावर घेतलं असून तिच्या मेहनतीचा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे.

बिग बाॅस नंतर राखी नियमीत जीमला जात आहे. अशातच तिच्या वर्कआऊटचा एक व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टा आकाऊंटवरुन शेअर केला आहे. यामध्ये राखी प्रचंड मेहनत करत असल्याचं दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तिला दोन लोक ट्रेन करत आहेत. तसेच यामध्ये राखी खाली डोकं वर पाय, असं करताना दिसत आहे.

काही दिवसांपुर्वी राखीने घरकाम करत असताना एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यादरम्यान, बिग बाॅसने तिला कामाची सवय लावली असल्याचं तिनं म्हटलं होतं. नुकतच अभिनेत्री शेहनाझ गिलने तिचं प्रचंड वजन कमी केलं आहे. तिच्यानंतरच राखीने तिचं वजन कमी करण्याकडे प्रचंड लक्ष देणं सुरु केलं असल्याचं अनेक लोक म्हणत आहेत.

दरम्यान, राखी नेहमीच तिचे हटके व्हिडीओ शेअर करत असते. नुकतचं तिने तिचा नागीन रुपातला फोटो शेअर केला होता. याशिवाय मुंबईच्या रस्त्यांवर ती अनेकदा फिरताना दिसते. त्यामुळे ती सतत विविध कारणांमुळे चर्चेत राहते.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

थोडक्यात बातम्या-

शाब्बास रे पठ्ठ्या! सर्वाधिक गोलच्या स्पर्धेत भारताचा सुनिल छेत्री मेसीपेक्षा सरस

Beta आणि Delta व्हेरिएंटवर ‘ही’ लस अधिक प्रभावी; अभ्यासकांनी केला उलगडा

मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केलाच नव्हता- किशोरी पेडणेकर

‘आमचं घर’ काही दिवसांपासून संकटात आहे, प्राजक्ता माळीचा ह्रदयस्पर्शी व्हिडीओ

राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे शरद पवारांच्या भेटीला; ‘या’ महत्वाच्या विषयावर चर्चा

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More