बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांत सिंग राजपूत पुनर्जन्म घेईन आणि त्याचा जन्म माझ्या पोटी होईल, या अभिनेत्रीचा दावा

मुंबई |  हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने अवघ्या 34 व्या वर्षी आपलं जीवन संपवलं. त्याच्या निधनाच्या धक्क्यातून त्याचे चाहते आणखी सावरले नाहीत. तोच अभिनेत्री राखी सावंतने सुशांतबद्दल मोठा दावा केला आहे.

सुशांत सिंग राजपूत पुनर्जन्म घेईन आणि त्याचा जन्म माझ्या पोटी होईल, असा दावा अभिनेत्री राखी सावंतने केला आहे. इन्स्टाग्राम पोस्ट करत तिने हा दावा केला आहे. तिने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ती म्हणते, “सुशांत सिंग रात्री माझ्या स्वप्नात आला होता आणि त्यानेच मला सांगितलं की मी तुझ्या पोटी जन्म घेईन”.

“मी रात्री झोपले. मग सुशांत सिंग माझ्या स्वप्नात आला. मग मला अचानक मोठ्याने आवाज आला. तर मी विचारले कोण आहे… तो म्हणतो मी सुशांत सिंग आहे… मी पुन्हा जन्म घेत आहे. माझ्या चाहत्यांना सांग की मी पुन्हा येतोय… राखी तु लवकरच लग्न करशील आणि तुझ्या पोटी मी जन्म घेईन”, असं राखी सावंत म्हणाली आहे.

दरम्यान, राखीचा हा व्हीडिओ पाहून सुशांतच्या चाहत्यांना राग अनावर झाला आहे. त्यांनी विविध प्रकारच्या कमेंट नोंदवत राखीविरोधात आपला राग कमेंटच्या रूपात व्यक्त केला आहे. असला काहीतरी भंपकपणा करू नको, असं त्याच्या चाहत्यांनी तिला सुनावलं आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

 

कोरोना काळात मनाला उभाऱ्या देणाऱ्या MPSC च्या सक्सेस स्टोरी-

आई-बाप दगड फोडायचे; मात्र बेलदाराचं पोर झालं डीवायएसपी!

श्रीगोंद्याच्या २ भावांची कमाल… एकाची उपजिल्हाधिकारी तर दुसऱ्याची नायब तहसिलदारपदी निवड!

बापानं प्रसंगी सालदार बनून मुलाला शिकवलं, पोरानं उपजिल्हाधिकारी बनून पांग फेडलं!

वडील टेम्पोवर ड्रायव्हिंग करत होते, त्यांना तिथंच कळालं आपला मुलगा तहसीलदार झाला!

भंगार गोळा करणाऱ्या बापाचा लेक झाला नायब तहसीलदार, बापाचे आनंदाश्रू थांबेना…!

शेतकऱ्याचा लेक बनला ‘गरूड कमांडो’.. देशात 59 वा क्रमांक मिळवून आई बापाच्या कष्टाचं चीज!

जिद्दीला सलाम! शेतकऱ्याची लेक बनली तहसीलदार तर जावई सीमेवर करतोय देश सेवा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More