बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर राखी सावंतने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | बोल्ड आणि बिनधास्त अशी ओळख असणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेचा विषय ठरते. मात्र, माझं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं असल्याचा खुलासा करत राखी सावंतने सर्वांनाच धक्का दिला होता.

राखी सावंत व तिचा नवरा रितेश गेल्या वर्षी बिग बॉस 15 (Big Boss) मध्ये देखील एकत्र दिसले होते. रितेश राखीला योग्य वागणूक देत नसल्याचं बिग बॉस शो दरम्यान सर्वांसमोर आलं. रितेश सोडून जाईल भीतीने गप्प राहणाऱ्या राखीने बिग बॉसचं 15वं सिझन संपल्यानंतर रितेशपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

नवऱ्यापासून वेगळं झाल्यानंतर आता राखी सावंतने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राखी सावंत ने तिचा रितेश नावाचा टॅटू हटवण्याचा निर्णय घेतला आहे. राखीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, राखीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती टॅटू हटवताना दिसत आहे. तीन वर्षाचं लग्न, रितेश तू माझ्या आयुष्यातून माझ्या शरीरातून आता कायमचा बाहेर असंही राखी यावेळेस म्हणाली आहे. राखीच्या या निर्णयाचं तिच्या चाहत्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

थोडक्यात बातम्या-

…’हे’ षडयंत्र भाजपवरच उलटणार, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

अनिल देशमुखांच्या मुलासह अजित पवार पोहोचले गडकरींच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ

चुकीला माफी नाही! वाहतुकीचे नियम मोडल्यानं अजित पवारांनी भरला ‘इतक्या’ हजारांचा दंड

2 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

“जोपर्यंत भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचं कौतूक करणार नाहीत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More