बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राखी सावंतचा नागीन अंदाज पाहिलात का?; पाहा व्हिडीओ

मुंबई | बिग बाॅस 14 ची सर्वांचं मनोरंजन करणारी कंटेस्टंट राखी सावंतने तीच्या सोशल मिडियावर नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ अभिनेत्री श्री देवीचा ‘नगिना’ या चित्रपटातला असून एका अॅपच्या मदतीने राखीने या व्हिडीओमध्ये तीचा चेहरा जोडला आहे. बिग बाॅस शोच्या टाॅप 5 मध्ये पोचल्यानंतर राखीने 14 लाख रुपये घेऊन तो शो सोडला होता.

या व्हिडीओला शेअर करत मला श्रीदेवी खुप आवडते तसचं ‘नगिना’ हा माझा आवडता चित्रपट आहे, असं राखीने लिहिलं आहे. एवढचं नाही तर हा चित्रपट पुन्हा तयार करण्यात आला तर तुम्हाला श्रीदेवीच्या भुमिकेत कोणाला पहायला आवडेल?, असा प्रश्न तीने तिच्या फॅन्सना विचारला आहे. या प्रश्नाचं उत्तर देखील कमेंटस मध्ये देण्यास राखीने सांगितलं आहे.

राखीने शेअर केलेल्या या व्हिडीओला तीच्या फॅन्सचा भरभरुन प्रतिसाद आला आहे. याआधी सुद्धा राखीने तीचा एका व्हिडीओ इंस्टावर शेअर केला होता. त्या व्हीडिओमध्ये तीनं बरेच घर काम करत असल्याचं सांगितलं होत. एवढचं नाही तर सध्या ट्रेंडींगला असलेल्या पावरी व्हिडीओच्या अंदाजात ‘य मै हूँ ये मेरा पोछा है…’, असा व्हिडीओ बनवला होता.

दरम्यान, तीला इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असून तीनं सोहेल खानकडे काम मागितलं होतं. सलमान खान आणि सोहेल खानमुळे राखीला बिग बाॅसमध्ये काम करायची संधी मिळाली, असं राखीने एका मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

थोडक्यात बातम्या-

‘या’ कारणाने पतीकडून पत्नीचा निर्घृण खून; सहा महिन्यांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

YouTube द्वारे पैसे कमवणाऱ्यांना गुगलचा मोठा झटका; केली ‘ही’ मोठी घोषणा

‘शेतकऱ्याची लाखमोलाची जमीन…’; नाना पटोलेंचा रामदेवबाबा अन् अंबानींना संतप्त सवाल

“सचिन वाझे ठाकरे सरकारचा जावई आहे का?”

महिलांवरील शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराबाबत अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More