बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर मी तुमचा ‘चड्ढा’ उतरवेल’; नवज्योत सिद्धूंवर केलेल्या ‘त्या’ टीकेमुळे राखीचा चढला पारा!

नवी दिल्ली | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. मात्र अशातच बॉलिवुड अभिनेत्री राखी सावंतने आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्ढा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राखीने कोणत्या कारणामुळे राघव चड्ढा यांच्यावर निशाणा साधला?, तर राघव चड्ढा यांनी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर टीका केली होती.

पंजाबच्या राजकारणामधील नवज्योत सिंग सिद्धू ‘ राखी सावंत’ असल्याचं राघव चड्ढा म्हणाले होते. यामुळे राखी संतापली आहे. राघव चड्ढा माझ्यापासून आणि माझ्या नावापासून लांब राहा, तुम्ही ट्रेंडिंगमध्ये येण्यासाठी तुम्हाला माझं नाव हवं होतं. पण जर मी तुम्ही माझ्या नावाचा वापर केलात तर मी तुमचा चड्ढा उतरवेल, असं म्हणत राखी बरसली.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांना कोणाचे नाव खराब करू नका आणि तुमच्या नेत्यांना शिकवा, असं एक नेटकरी आप पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना म्हणाला. ही पोस्ट राखीने आपल्या अकाउंटवर शेअर केली आहे. माझ्या पतीने मला पाठिंबा दिला आहे, असं राखी म्हणाली.

दरम्यान, सोशल माध्यमांवर ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना संमिश्र कमेंट्स केल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

माही मार रहा है! सराव सामन्यातच धोनीने मारले अर्धाडझनभर षटकार, पाहा व्हिडीओ

देवेंद्र फडणवीस अन् जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास!

अमरिंदरसिंग यांच्या राजीनाम्यानंतर पंजाबचा ‘कॅप्टन’ कोण?; ही 2 नाव आघाडीवर!

…आता तर कोथळा काढायची भाषा वापरली जाते- शरद पवार

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More