राखी सावंत पुन्हा बांधणार लग्नगाठ, ‘या’ व्यक्तीसोबत लग्न करणार असल्याचं केलं जाहीर
मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतचं एकेकाळी ‘परदेसिया ये सच है पिया’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं. त्यानंतर राखी चित्रपटांमध्ये तसेच आयटम साँगमध्ये दिसायची बंद झाली. अशातच राखीने ‘बिग बॉस 14’ मध्ये एंट्री मारली. बिग बॉस या रियालिटी शो मध्ये राखीने तिची नव्याने वेगळी ओळख बनवली.
सर्वांचं मनोरंजन करणाऱ्या राखीने अनेकदा बिग बाॅस शो मध्ये तिच्या लग्नाबद्दल उल्लेख केला होता. यादरम्यान तिने बऱ्याच वेळा तिचं लग्न झाल्याचं सांगितलं तर बऱ्याचदा लग्न न झाल्याचं देखील सांगितलं. बिग बॉस शो मध्ये कंटेस्टंट असणाऱ्या अभिनव समोर राखीने अनेकदा त्याच्या प्रति असणाऱ्या प्रेमाबद्दल बोलून दाखवलं होतं. अभिनवची पत्नी रुबिना समोर देखील राखीने बऱ्याच वेळा अभिनवला तिच्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं.
खूप वेळा रितेश नावाच्या एका बिझनेसमन सोबत राखीने लग्न झाल्याचं सांगितलं आहे. तसेच तिचा पती जगासमोर येण्यास नकार देतो आणि ते जास्त बोलत देखील नाहीत, असंही राखीने सांगितलं होतं. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत राखीने पुन्हा रितेश सोबत लग्नगाठ बांधणार असल्याचं सांगितलं आहे. ती आणि तिचा पती आता परत बोलायला लागले असून ते व्हिडीओ कॉल वर देखील बोलत असल्याचं राखीने या दरम्यान सांगितलं आहे.
दरम्यान, राखीने गुपचूप लग्न केलं होतं. त्यामुळे तिचं लग्न खरंच झालं आहे की नाही? हा अनेकांना मोठा प्रश्न होता. मात्र या वेळेस राखी आता माध्यमांसमोर तसेच सगळ्यांसमोर लग्न करणार आहे. तसेच तिचा पती आता जगासमोर येण्यास तयार झाला आहे, असं देखील राखीने सांगितल आहे.
थोडक्यात बातम्या-
भारताच्या हद्दीत चुकून घुसला पाकिस्तानी मुलगा, त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल!
‘तुमचं वजन वापरून बघा काय मिळतंय का?’; आव्हाडांचा फडणवीसांना टोला
बोंबला! बॉयफ्रेन्डची हत्या करून वडिलांसोबत केलं लग्न, प्लॅन करून तिघांनी केला त्याचा खात्मा!
स्वत:च्या लग्नाची पत्रिका देण्यास गेलेल्या नवरदेवाचा बाईक अपघातात मृत्यू!
शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, सक्तीचा आराम करण्याची डॉक्टरांची सूचना
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.