राखी सावंतचं दुसरं लग्नही धोक्यात! धक्कादायक कारण आलं समोर
मुंबई | बाॅलिवूड(Bollywood) अभिनेत्री राखी सावंत(Rakhi Sawant) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येत असते. नुकतंच तिच्या आईचं निधन झाल्यानं ती चर्चेत आली होती. परंतु आता मात्र राखी तिच्या पतीमुळं चर्चेत आली आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राखी आणि आदिलनं खान (Aadil Khan) रजिस्टर लग्न केलं होतं. परंतु आदिल हे लग्न झालंय असं मान्य करायला तयार नव्हता. बराच गोंधळ झाल्यानंतर आदिलनं हे लग्न मान्य केलं होतं.
आता मात्र आदिल आणि राखीच्यात सगळं काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. कारण राखीनं मीडियासमोर जे काही सांगितलं आहे ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसत आहे.
राखी मीडियाशी बोलताना म्हणत आहे की, आदिल तू नीट राहा. त्या मुलीशी संबंध तोडून टाक. त्या मुलीबद्दल बोलताना राखी म्हणाली, तुला लाज वाटत नाही का एका मुलीचा संसार तोडताना.
आता राखीच्या बोलण्यावरून साफ दिसत आहे की आदिलचं बाहेर एका मुलीसोबत अफेअर चालू आहे. त्यामुळं राखीचं दुसरं लग्न धोक्यात आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
Comments are closed.