राखीच्या ‘त्या’ आरोपानंतर आदिल खानला अटक

मुंबई | सध्या बाॅलिवूडमध्ये राखी सावंतची (Rakhi Sawant) जोरदार चर्चा सुरु आहे. राखी तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. राखीचं दुसरं लग्नदेखील आता धोक्यात आलं आहे. नुकतेच राखीच्या आईचं दिर्घ आजाराने निधन झालं आहे. अशातच तिच्या वैवाहिक आयुष्यामुळं ती अडचणीत आहे.

राखीचा पती आदिलचे एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर (Extramarital affair) असल्याचं तिनं मिडियाशी बोलताना सांगितलं. यामुळेच विवाहबाह्य संबंध आणि फसवणुकीचा आरोप करत राखीने आदिलवर एफआयआर (FIR) दाखल केला आहे, त्यानंतर राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी याला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे.

लग्नाच्या नावाखाली राखीकडून सर्व दागिने आणि पैसे घेतल्याचा आरोप राखीनं केला आहे. एफआयआर नोंदवण्यापूर्वी राखीने मिडियाशी संवाद साधला. यावेळी ती म्हणाली की आदिलने माझ्याकडून माझ्याच घराच्या चाव्या हिसकावून घेतल्या आहेत आणि आता तो परत करण्यास नकार देत आहे. तो बऱ्याच दिवसांपासून माझ्यावर अत्याचार(torture) करत आहे,असंही ती पुढे म्हणाली.

दरम्यान, 2022 मध्ये राखीनं आदिलसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. हे कोर्टमॅरेज (Courtmarriage) तिनं गुपचूप उरकलं होतं. या लग्नाचे फोटो मिडीयासमोर आल्यानंतर याचा खुलासा राखीनं केला होता. आदिलशी तिनं कोर्टमॅरेज आणि निकाह केल्याचं कबूल केलं. लग्नानंतर राखीनं तिचं नावदेखील बदललं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More