Raksha Bandhan 2024 | आज श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा आहे. पौर्णिमा तिथी पहाटे 3 वाजून 4 मिनिटांनी सुरू होईल आणि रात्री 11 वाजून 56 मिनिटांपर्यंत राहील. आज नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन सण साजरे केले जाणार आहेत. नारळी पौर्णिमेचा हा सण कोळी बांधवासाठी तर रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या नात्यासाठी खास असतो.आजच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून हा उत्सव साजरा करत असते. (Raksha Bandhan 2024)
या दिवशी बहीण भावाच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते तर भाऊ बहिणीला संरक्षणाचे वचन देतो. मात्र, भद्रासारख्या अशुभ काळात राखी बांधू नये असे मानले जाते. पौर्णिमेची समाप्ती 19 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 55 मिनिटांनी होणार आहे. या दिवशी भद्रा आहे. मग, राखी नेमकी कधी बांधावी, असा प्रश्न पडतो.
ज्योतिषाचार्योंनुसार 19 ऑगस्टरोजी रात्री 2 वाजून 21 मिनिटांना भद्रा सुरु झाला आहे. सकाळी 9 वाजून 51 मिनिटांपासून 10 वाजून 53 मिनिटांपर्यंत भद्राचे शेपूट राहील. त्यानंतर भद्राचे समापन दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी होणार आहे. हा काळ अशुभ मानला जातो. त्यामुळे या काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही.(Raksha Bandhan 2024)
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता?
आज 1 वाजून 43 मिनिटापासून संध्याकाळी 4 वाजून 20 मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी सर्वात चांगला मुहूर्त आहे. राखी बांधण्यासाठी 2 तास 37 मिनिटे मिळतात. त्यानंतर संध्याकाळी प्रदोष काळातही राखी बांधता येते. हा काळ संध्याकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी सुरु होतो. तो रात्री 9 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे.(Raksha Bandhan 2024)
भद्रात राखी का बांधली जात नाही?
पौराणिक कथानुसार, भद्रा काळात लंकापती रावणाच्या बहिणीने मनगटावर राखी बांधली होती. त्यानंतर वर्षभरातच त्याचा विनाश झाला. भद्रा ही शनिदेवाची बहीण आहे, असे मानले जाते. भद्राला ब्रह्मदेवाकडून शाप मिळाला होता की ज्याने भद्रामध्ये कोणतेही शुभ कार्य केले तर त्याचे फळ अशुभ होते.(Raksha Bandhan 2024)
News Title – Raksha Bandhan 2024 shubh muhurat
महत्त्वाच्या बातम्या-
आज रक्षाबंधनाचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार खास, मोठा धनलाभ होणार!
‘या’ राशीच्या लव्ह लाईफमध्ये येणार रोमँटिक टर्न!
मराठा आरक्षणाबाबत संभाजी भिडेंचं मोठं वक्तव्य!
रेखा यांचा खळबळजनक खुलासा, म्हणाल्या, ‘मी तिघांसोबत…’
राजकारण तापलं! भाजपने अजित पवारांना दाखवले काळे झेंडे