रक्षाबंधन बनवा खास; तुमच्या बहिणीला गिफ्ट द्या ‘हे’ स्वस्तात मस्त स्मार्टफोन

Raksha Bandhan Gift l ऑगस्टमध्ये अनेक सण येतात आणि या सणांच्या आगमनाबरोबरच लोक अनेक नवीन गोष्टी खरेदी करतात. अशातच अगदी काही दिवसांवर बहीण भावाचा अतूट असा रक्षाबंनधन हा सण आला आहे. जर तुम्हाला तुमच्या बहिणीसाठी रक्षाबंधन गिफ्ट घ्यायचे असेल आणि तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. तुम्ही तुमच्या बहिणीला स्मार्टफोन भेट देऊ शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बजेटच्या पलीकडे जाण्याची गरज नाही. कारण आज आपण 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या भन्नाट स्मार्टफोन्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Raksha Bandhan Gift l भन्नाट फीचर्सचे ‘हे’ स्मार्टफोन करा गिफ्ट :

Samsung Galaxy M14 :

जर तुम्हाला सॅमसंग फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही सॅमसंग गॅलेक्सी M14 हा स्मार्टफोन गिफ्ट करू शकता. हा स्मार्टफोन अनेक फीचर्ससह येतो. यामध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळेल. तसेच स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरने देखील सुसज्ज आहे. कंपनी या फोनसोबत 4 वर्षाचे सिक्युरिटी अपडेट देखील देत आहे. हा फोन तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून 8,798 रुपयांना 37 टक्के डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

Redmi 13C :

Redmi चा हा फोन तुम्हाला अतिशय स्वस्त दरात मिळत आहे. 4GB रॅम, 128GB स्टोरेज व्हेरिएंट अतिशय उत्कृष्ट लुक आणि हिरव्या रंगात येतो. यामध्ये AI ट्रिपल कॅमेरा सेटअप देखील उपलब्ध आहे. फोटो-व्हिडिओग्राफीसाठी, त्याचा फ्रंट कॅमेरा 50 मेगापिक्सेल आहे. जरी या फोनची मूळ किंमत 11,999 रुपये आहे, परंतु तुम्हाला हा 36 टक्के डिस्काउंटसह फक्त 7,699 रुपयांमध्ये मिळत आहे.

या स्मार्टफोनवर मिळतोय भरघोस डिस्काउंट :

Lava O2 :

मॅजेस्टिक पर्पल कलरमध्ये येणारा हा स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. मुलींनाही जांभळा रंग आवडतो आणि या फोनमधील फीचर्सही खूप चांगले आहेत. या फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला हा फोन Amazon वर 8,499 रुपयांमध्ये डिस्काउंटसह मिळत आहे.

या स्मार्टफोन्स व्यतिरिक्त तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे बजेट थोडे वाढवू शकता. तुम्ही जास्त किंमतीत आणखी चांगले पर्याय मिळवू शकता.

News Title : Raksha Bandhan Gift Special Best Smartphone

महत्त्वाच्या बातम्या-

नागरिकांनो ‘या’ मेसेजपासून सावध राहा; अन्यथा बँक खात होऊ शकत रिकामं

“शरद पवारांनी महाराष्ट्राचं मणिपूर करायला हातभार..”; राज ठाकरेंचा हल्लाबोल

अलर्ट! येत्या काही तासात ‘या’ जिल्ह्यांत वाढणार पावसाचा जोर

12 पैकी ‘या’ 2 राशींवर महादेवाची कृपा राहणार

“नारायण राणेंनी मला फुकट धमक्या देऊ नयेत, नाहीतर..”; जरांगे पाटील यांचा थेट इशारा