Top News महाराष्ट्र मुंबई

रक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली

मुंबई | रावेर मतदारसंघातील भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर आक्षेपार्ह माहिती लिहिण्यात आली होती. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकाराची दखल घेत इशारा दिल्यानंतर भाजपनं त्वरित ही चूक दुरुस्त केली आहे.

भाजपच्या साईटवर सर्व खासदारांची फोटोंसह माहिती देण्यात आली आहे. यामध्ये रक्षा खडसे यांच्या फोटोखाली होमोसेक्सुअल असं लिहिण्यात आलं होतं. यासंदर्भात स्क्रीनशॉट समोर येताच एकच खळबळ उडाली होती.

रक्षा खडसे यांच्याबद्दल अशी माहिती वाचून मला धक्का बसला. महिलांचा अशा प्रकारे अवमान करणाऱ्यांना महाराष्ट्र सरकार सोडणार नाही. भाजपने संबंधितांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र सायबर सेलला या प्रकरणात लक्ष घालावं लागेल, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, हा प्रकार समोर येताच भाजपने त्वरित कार्यवाही केली व चूक सुधारली. मात्र याप्रकरणी भाजपकडून अद्याप कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलं नसून कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.

गृहमंत्र्यांनी केलेलं ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग

” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही?”

“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”

आतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…

शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं कंगणा राणावतला पडलं महागात!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या