बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आता महिलांनी घरकोंबड्या सरकारसारखं घरातच बसायचं का?”

औरंगाबाद | राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. राज्यातील अनेक भागात अंगावर काटा आणणाऱ्या महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. या वाढत्या घटनांवरून खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. रक्षा खडसे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Raksha Khadse Criticises Mahavikas Aghadi Goverment)

बीड, साकीनाका, परभणी, डोंबिवलीसह अनेक ठिकाणी झालेला निर्भयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडला नाही. महिला सुरक्षेच्या (Women Security) बाबतीत सरकारची बेफिकरी चीड आणणारी आहे, अशी टीका रक्षा खडसेंनी केली आहे. तर आता महिलांनी स्वसुरक्षेसाठी कायदा हाती घ्यायचा की घरकोंबड्या सरकारसारखं घरातच बसायचं? असा खोचक सवाल रक्षा खडसे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारने दोन वर्षात फक्त निराशा केली. तत्कालीन गृहमत्र्यांनी महिला सुरक्षेसाठी शक्ती कायदा आणण्याच्या फक्त घोषणा केल्या पण कायदा काही अद्याप लागू झाला नाही, असा घणाघातही रक्षा खडसे यांनी केला आहे. महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरलेल्या आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) सत्तेत राहाण्याचा काही एक अधिकार नाही, असा हल्लाबोलही रक्षा खडसे यांनी केला आहे.

महाराष्ट्रात एफआयआर नोंदवण्यात हलगर्जीपणा, पिडीतेचा जबाब नोंदवून घेण्यात टाळाटाळ करणाऱ्या अशा पोलिसांवर कारवाई का केली जात नाही?, असा सवाल रक्षा खडसे यांनी उपस्थित केला आहे. प्रत्येक वेळी भाजपने धक्का दिल्याशिवाय सरकारची गाडी हलतच नाही, अशी खरमरीत टीकाही केली आहे.

थोडक्यात बातम्या-

ममता बॅनर्जी घेणार ठाकरे-पवारांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

एसटी संपाचा तिढा सुटणार का?; गोपीचंद पडळकर म्हणाले…

बिग बॉसच्या घरात कोरोनाची वाईल्ड कार्ड एन्ट्री; ‘या’ सदस्याला कोरोनाची लागण

गृहिणींचं बजेट मोडलं! ‘या’ भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ

इंधन दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ; वाचा आजचे ताजे दर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More