बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर…’; आरक्षणावरून नणंद-भावजय आमनेसामने

जळगाव |  महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आलं होतं. मात्र रद्द करण्यात आलेल्या जिल्ह्यांमधील रिक्त जागांवर निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. यावरून भाजपवासी झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची कन्या यांनी फडणवीसांवर टीका केली होती.

ओबीसी नेत्यांचं नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?, असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना केला होता. त्यांच्या या टीकेला एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर आमच्यासारख्या ओबीसींना संधी मिळाली नसती. रक्षा खडसे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळालं नसतं, असं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे. एकीकडे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ओबीसा आरक्षणावरून टीकाटिप्पणी सुरू आहे. तर आता दुसरीकडे या मुद्द्यावरून नणंद-भावजय आमने सामने आल्या आहेत.

दरम्यान, रक्षा खडसे यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर रोहिणी  खडसे काय काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

सचिन वाझेच्या पत्रातील आरोप खोटे, जनता दूधखुळी नाही- जयंत पाटील

मुंबईत कोरोनाचा पुन्हा उद्रेक?, सक्रिय कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, जाणुन घ्या आकडेवारी

“चंद्रशेखर बावनकुळेंनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांना तिकीटच दिलं नाही”

43 वेळा कोरोना पाॅझिटिव्ह! 72 वर्षीय आजोबांनी अशी केली कोरोनावर मात

राज्य सहकारी बँकेचा नफा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल 14 टक्क्यांनी वाढला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More