बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रक्षकच ठरला भक्षक! वडिलाने केला अवघ्या 11 वर्षाच्या मुलीवर वारंवार बलात्कार

पुणे | महिला अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांवर अत्याचार हा अनोळखी व्यक्तीकडून होतो असं नाही तर कधी कधी तो ओळखीच्या व्यक्तीकडूनही होतो. पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागात वडील आणि मुलगी नात्याला काळीमा फासण्याचं काम एका वडिलानं केलं आहे. 45 वर्षीय वडील असणाऱ्या व्यक्तीनं अवघ्या 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे.

वाकड पोलिसांच्या कार्यक्षेत्रात या गुन्ह्याची नोंद केली गेली आहे. 45 वर्ष वय असणाऱ्या व्यक्तीनं आपल्या 11 वर्षाच्या मुलीवर ‘तू मोठी झालीस का ते पहायचंय’, असं म्हणत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काहीही कामधंदा न करता घरात बसून राहाणाऱ्या नराधमानं घरी त्याची पत्नी नसताना आपल्या मुलीवर अत्याचार करायचा. तू जर तुझ्या आईला सांगितलं तर तुला ठार मारेन, अशी धमकी त्या चिमुरडीला दिल्यानं तिनं तिच्या आईला काही सांगितलं नाही.

नराधमानं जेंव्हा तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिनं विरोध केला. विरोध केला म्हणून तिला या नराधमानं मारहाण केली. रात्री तिची आई घरी आल्यावर शेजारील महिलेनं तुमच्या मुलीला तिच्या वडीलांनी मारहाण केल्याचं सांगितलं. मुलीच्या आईनं जेव्हा तिला मायेनं विचारलं तेंव्हा तिनं तिच्यावर वडीलांकडूनच अन्याय झाल्याचं आईला सांगितलं. त्यानंतर मुलीच्या आईनं वाकड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, वाकड पोलिसांनी लागलीच आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी संगिता गोडे या करत आहेत. पिंपरी चिंचवड भागात अशी वाईट घटना घडल्यानं सर्वत्र काळजी व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या 

‘मला टाॅपलेस पंतप्रधान व्हायचंय’; तरूणीने व्यक्त केली अजब इच्छा

‘चला हवा येऊ द्या’ मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानं सोडला शो; चाहत्यांना मोठा धक्का

युएईत रंगणार वर्ल्ड कपचा थरार; पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

‘माझं शरद पवारांना आव्हान आहे की…’; किरीट सोमय्यांचं पवारांना खुलं आव्हान

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी सानिया मिर्झाचा मोठा निर्णय! व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More