बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रकुल प्रीत सिंह करतीये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला डेट; फोटो सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचे अनेक चाहते आहेत. तिचं काम आणि सिनेमांमुळे ती अनेकदा चर्चेत असते. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या ड्रग्ज प्रकरणातही एनसीबीने रकुलला समन्स बजावलं होतं. त्यावेळी देखील अभिनेत्री बरीच चर्चेत आली होती. रकुल प्रीत सिंह आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळेस चर्चेत येण्याचं कारण थोडं खास आहे.

रकुल प्रीतने कालच तिचा वाढदिवस साजरा केला. पण तिच्या वाढदिवशी तिनेच तिच्या चाहत्यांना एक खास गिफ्ट दिलं आहे. आपल्या खासगी आयुष्याबद्दल जास्त व्यक्त न होणाऱ्या रकुलने तिच्या रिलेशनशीपचा खुलासा केला आहे. रकुल प्रीत सिंह ही अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानी याला डेट करत आहे. एक रोमँटिक फोटो शेअर करत दोघांनीही आपल्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.

तुझ्याशिवाय दिवस दिवसासारखे वाटत नाहीत, तुझ्याशिवाय स्वादिष्ट जेवण जेवणातही मजा नाही, माझ्यासाठी माझं जग असलेल्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं कॅप्शन देत जॅकीने रकुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर रकुलनेही हाच फोटो शेअर करत जॅकीला थँक यू म्हटलं आहे.

या दोघांनी त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब करताच चाहते मात्र खुुप खुश झाले आहेत. त्या दोघांच्या या रोमँटिक फोटोवर कमेंट करत चाहते दोघांनाही भरभरून शुभेच्छा देत आहेत. दोघांच्या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by JACKKY BHAGNANI (@jackkybhagnani)

 

 

 

थोडक्यात बातम्या-

“खरं तर सरकारला काकांचं दुःख सतावतय म्हणून ‘महाराष्ट्र बंद’चा देखावा”

‘शेतकऱ्यांनीही चार जणांना ठेचून मारलं’; चंद्रकांत पाटलांची खरमरीत टीका

आर्यन खानच्या जामीनाबाबत ‘ही’ मोठी माहिती आली समोर

महाराष्ट्र बंद: ठाण्यात रिक्षाचालकांवर शिवसैनिकांची दादागिरी, पाहा व्हिडीओ

‘…मग मनसेचा हत्येला पाठिंबा आहे का?’; नवाब मलिक गरजले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More