महाराष्ट्र मुंबई

“किंचाळणाऱ्या बोक्याला पिंजऱ्यात टाकून उद्धव ठाकरेंनी वडिलांसारखी हिंमत दाखवली”

मुंबई | रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काल पोलिसांनी अटक केली आहे. यावर प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते राम गोपाल वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांसारखी हिंमत दाखवली, असं म्हणत राम गोपाल वर्मा यांनी अर्णब गोस्वामींवर करण्यात आलेल्या कारवाईवर समाधान व्यक्त केलं आहे.

ही कारवाई पाहून मला आनंद झाला. अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांसारखी हिंमत दाखवली. एका किंचाळणाऱ्या बोक्याला त्यांनी पिंजऱ्यात टाकलं, असं राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती.

 

महत्वाच्या बातम्या-

‘त्या’ 9 पोलिसांना निलंबित करा; राम कदम यांची राज्यपालांकडे मागणी

“एका युवराजला वाचवायला महाराष्ट्रालाच का खोटं ठरवताय?”

दिल्लीत महाराष्ट्र सदनाबाहेर झळकले ‘महाराष्ट्रात आणीबाणी 2.0’ चे पोस्टर्स!

“अर्णब गोस्वामी भाजपचे प्रवक्ते म्हणूनच भाजप रस्त्यावर”

“जसं सामना शिवसेनेचं मुखपत्र, तसं ‘ते’ भाजपचं चॅनेल”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या