बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुम्ही अधिकारी खंडणी वसूल करण्यासाठी नेमले आहेत का?- राम कदम

मुंबई | सचिन वाझे चौकशी प्रकरणावरून शिवसेना आणि भाजप आमने सामने आली होती. शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा या प्रकरणामुळे टीका सहन करावी लागली होती. परंतू गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने उचलून धरताच राष्ट्रवादी आक्रमक झाली. राष्ट्रवादीने भाजपला त्यांच्या सत्ताकाळातील प्रकरणाचा आरसा दाखवला आहे. यावर आता भाजप नेते राम कदम यांनी राष्ट्रवादीच्या आरोपाला उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप म्हणजे ‘शिळ्या कढीला ऊत आहे’. एखादा अधिकारी आमच्या काळात नियुक्त झाला, म्हणजे तो पाळत ठेवणारा आणि मग तुमच्या काळात काय दहशदवादी कृत्य करायला आणि खंडण्या वसूल करायला नियुक्त केले आहेत का? , असा टोला राम कदम यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे.

राष्ट्रवादीचे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यामुळे त्यांनी आरोप करताना तर्कशुद्ध आरोप करावे, असे कदम म्हणाले. याआधी, देवेंद्र फडणवीस यांनी माहिती संचालक पदावर, पोलीस खात्यातील आणि त्यातही सायबर गुन्हे शाखेच्या ब्रिजेश सिंग यांना आणून आपल्याच सरकार मधील मंत्र्यावर पाळत ठेवण्याचे काम केले होते. आता तेच पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर प्रवचने झोडत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीनं केला होता.

दरम्यान, राम कदम यांनी याआधी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या घराचे आणि ऑफिसचे फोटो टाकत टीका केली होती. शेतकऱ्यांची वीज तोडण्यात येत आहे तर दुसरीकडे ऊर्जामंत्री वीजेची उधळपट्टी करत आहेत, असं ट्विट कदम यांनी केलं होतं.

पाहा ट्विट – 

 

थोडक्यात बातम्या-

महिलासंदर्भात वागताना, बोलताना… सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश-वकिलांना महत्त्वाचा सल्ला

‘काहीजण वडिलोपार्जित संपत्ती विकून घरखर्च भागत असेल तर हे…’; रोहित पवारांची मोदींवर टीका

‘या’ कारणामुळे बांगलादेशच्या कर्णधाराने आगामी टी ट्वेन्टी सिरीज न खेळण्याचा घेतला निर्णय!

मोदींचा हाफ चड्डीतील फोटो शेअर करत प्रियंका गांधींचा भाजपला टोला, म्हणाल्या…

महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More