Top News महाराष्ट्र मुंबई

“काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी किंवा सोनिया गांधी नाही तर शिवसेना ठरवणार, काँग्रेसचा स्वाभिमान संपला”

मुंबई | महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष भाजपने हे सरकार कोसळणार असल्याची भाकीत केलीत. त्यासोबतच काँग्रेसला डावललं जात असल्याची टीका केली. अशाचप्रकारे भाजप नेते राम कदम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसला सत्तेचा इतका लोभ आहे की काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी किंवा सोनिया गांधी नाही तर शिवसेना ठरवणार, काँग्रेसच्या स्वाभिमान संपला असल्याचं राम कदम यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या, 12 महिन्यांमध्ये सतत अपमानित करणाऱ्या शिवसेनेपुढे काँग्रेसनं गुडघे टेकले आहेत, असं म्हणत राम कदमांनी काँग्रेसवर टीके केली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर कदम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

 

थोडक्यात बातम्या-

‘आम्ही नाटक कंपनी असलो तरी…’; निलम गोऱ्हेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर

“गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापडा झालाय?”

पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीच्या ‘या’ वाक्यामुळे आजीने संपवलं आयुष्य!

मिर्झापूर फेम गुड्डू भैय्याची लोकप्रियता शिखरावर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

‘औरंगजेब तुमचा आदर्श आहे का?’; शिवसेनेचा काँग्रेसला सवाल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या