Top News महाराष्ट्र मुंबई

“तेव्हा शिवसेना गोट्या खेळत होती का?”

मुंबई | औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून राजकारण चांगलंच तापू लागलं आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये यावरून संघर्ष चालू आहे. याच पार्श्वभमूीवर भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

भाजपसोबत शिवसेना पाच वर्ष सत्तेत होती. त्यावेळेस शिवसेनेने औरंगाबादचं नाव संभाजीनगर करा हा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे का पाठवला नाही?, तेव्हा शिवसेनेचे नेते गोट्या खेळत होते का?, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्याबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यावर आता शिवसेनेला पुन्हा हा मुद्दा उपस्थित करावासा वाटत आहे, असंही कदमांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राम कदमांनी केलेल्या टीकेवर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“राम मंदिराच्या वर्गणीसाठी फक्त हिंदू कुटुंबांकडेच जाणार”

मुकेश अंबानींना मोठा धक्का; सेबीने रिलायन्सला ठोठावला 25 कोटींचा दंड

“हिंदू देशविरोधी असू शकत नाही मग गांधींची हत्या करणारा गोडसे कोण होता?”

“बाळासाहेब ठाकरे हे कायम हिंदूहृदयसम्राट राहिले आहेत आणि कायम राहतील”

सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका, हॉस्पिटलमध्ये दाखल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या