महाराष्ट्र मुंबई

चित्रगुप्तानेही पाप-पुण्याचा हिशेब मांडताना महाविकास आघाडीला शाप दिले असतील- राम कदम

मुंबई | आम्ही पालघर साधू हत्याकांड अजून विसरलेलो नाही. पालघर हत्याकांडाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याची मागणी आता आम्ही उचलून धरणार आहोत. किमान आता तरी या अहंकारी सरकारला सद्बुद्धी यावी, असx वक्तव्य राम कदम यांनी केली.

गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरे सोमवारपासून खुली झाली. आज भाजप आमदार राम कदम यांनी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राम कदम यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलंय.

अटी घालून मंदिरे उघडायची होती तर हे आधी करता आले नसते का? भक्तांनी आणि महाराष्ट्रातील लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. त्यांनी महाविकासआघाडी सरकारला कदापी माफ करू नये, असं राम कदम यांनी सांगितलंय.

आज चित्रगुप्त पाप-पुण्याचा हिशेब लिहत असले तर तोदेखील महाविकासआघाडी सरकारला यासाठी शाप देईल, अशी टीका राम कदम यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

“हिंदू सणांवर बंदी हा महाविकासआघाडीचा कॉमन मिनिमम प्रोगाम असेल”

शेवटची ओवाळणी! शहीद ऋषिकेश जोंधळेंना बहिणीने ओवाळलं

काँग्रेस नेतृत्त्वाला बिहारमधील पराभव सामान्य बाब वाटत असावी- कपिल सिब्बल

राज्याच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता म्हणजे कृष्णकुंज- संदीप देशपांडे

हाथरसच्या नावाने गरळ ओकणारे राज्य सरकारचा आता कुणी गळा धरलाय?- निलेश राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या