बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गुलामासारखी वागणूक मिळत होती तर तेव्हा तुमचं तोंड शिवलं होतं का?”

मुंबई | पाच वर्षे आम्ही फडणवीस सरकारमध्ये होतो. पण शिवसेनेला सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा धक्कादायक दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. याला आता भाजप आमदार राम कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी संजय राऊत यांना 7 वर्षांपर्यंत शिवसेना का होती. आलिशान बंगला ,आलिशान गाड्या, आलिशान मंत्रालयातील केबिन हे सर्व तुम्हाला हवं होतं. गुलामासारखी वागणूक तुम्हाला मिळत होती तर कोणी तुमचे तोडं शिवलं होतं?, असा सवाल राम कदम यांनी केला आहे.

तुमचा स्वाभिमान कुठे होता. 7 वर्षापर्यंत शिवसेना गप्प का होती?, असं म्हणत राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच राज्य सरकार विरोधातील जनतेचा रोष दुसरीकडे वळवण्यासाठी हे वक्तव्य करण्यात येत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, युतीचं सरकार आलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण गेल्या पाच वर्षात शिवसेना संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. शिवसेना सत्तेत असतानाही गावोगावी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला गेला. पाच वर्षे सत्तेत होतो. पण सत्तेत असूनही गुलाम होतो. गुलामासारखी वागणूक मिळत होती, असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.

थोडक्यात बातम्या- 

“आम्ही कोरोनाने मेलो तरी हरकत नाही, मुलांना लस मिळायला हवी होती”

भाजपला मोठा धक्का!; एकाचवेळी 15 नेत्यांचा पक्षाला रामराम

“…हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता विरोधकांनी ठेवायला हवी”

‘…म्हणून इतक्यात पेरणी करू नका’; कृषी विभागाचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला

‘2024 नंतरही ते भावी पंतप्रधानच असतील…’; भाजप नेत्याची बोचरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More