“ज्यांना जय श्रीराम म्हणायला लाज वाटते, त्यांना शिवसेनेचा पाठिंबा”
मुंबई | शिवसेनेनं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक न लढवता तृणमुल काँग्रेसच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे, असं ट्विट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना बंगाल निवडणूकमध्ये तृणमुल काँग्रेसला पाठींबा देणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावरून आता भाजप नेते राम कदम यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.
जय श्रीराम म्हणायला ज्यांना लाज वाटते, त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला आहे, असं म्हणत राम कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. सोबत बंगालच्या निवडणुकीत शिवसेना का उतरत नाही?, असा सवाल करत शिवसेनेनं बंगालच्या निवडणुकीत उतरावं त्यांना त्यांची औकात कळेल, अशा शब्दांत राम कदम यांनी शिवसेनेवर टीका केली.
राम कदमांनी शिवसेनेची दुखरी नस असणाऱ्या बिहार निवडणुकीचाही उल्लेख केला. शिवसेनेला बिहारमध्ये एकाही जागेवर डिपॉझिट वाचवता आलेलं नाही. त्यातून धडा घेत त्यांनी बंगालमध्ये न लढण्याचा निर्णय घेतला असावा, तसेच जर शिवसेना बंगालमध्ये लढली तर ते एकाही उमेदवाराचं डिपॉझिट वाचवू शकणार नाही, असा टोला राम कदम यांनी शिवसेनेला लगावला.
दरम्यान, शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अनेक जणांच्या मनात कुतूहल आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थिती पाहता ही निवडणूक ‘दीदी विरुद्ध सगळे’ अशी होणार आहे. सर्व एम – मनी, मसल्स आणि मीडिया ‘म’मतादीदींच्या विरोधात वापरले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका न लढवता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ममता दीदींना गर्जना करणारे यश चिंतीतो. आमच्या मते त्याच खऱ्या बंगाली वाघीण आहेत, अशा आशयाचे ट्विट संजय राऊत यांनी केलं होतं.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 4, 2021
थोडक्यात बातम्या-
अजित पवारांविरोधात सुधीर मुनगंटीवारांचा हक्कभंग प्रस्ताव!
देवेंद्र फडणवीसांनंतर आता योगी आदित्यनाथ यांनीही दिला ‘मी पुन्हा येईन’चा नारा
Renault Kiger गाडीचा बाजारात धुमाकूळ; पहिल्याच दिवशी झाली विक्रमी विक्री
कोरोना पाठोपाठ अमरावतीत ‘या’ आजाराचा शिरकाव!
पोलिसाच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या; उस्मानाबादमध्ये घडलेल्या घटनेने महाराष्ट्र हादरला!
Comments are closed.