महाराष्ट्र मुंबई

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा- राम कदम

मुंबई | पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप आमदार राम कदम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे.

पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी राम कदम यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. त्यांना या संदर्भात ट्विट केलंय. राम कदम यांच्या सोबत पश्चिम बंगालमधील मुंबईत राहणारे काही नागरिकही उपस्थित होते.

पश्चिम बंगालमध्ये लोकशाहीची सुरक्षा करण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जावी यासाठी आम्ही राज्यपालांच्या भेटीला चाललो आहोत. आमची मागणी राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवावी, असं राम कदम यांनी ट्विट करत म्हटलं होतं.

दरम्यान, राम कदम यांच्या नेतृत्वात खारमध्ये ममता बॅनर्जी यांचा निषेध करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत पश्चिम बंगालमधील नागरिकदेखील होते.

 

 

थोडक्यात बातम्या-

सरकारी कार्यालयातून जिन्स आणि टी-शर्ट हद्दपार; सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता नवीन ड्रेस कोड

…म्हणून नवरदेवाने रागाच्या भरात केलं नवरीच्या बहिणीचं अपहरण

“आमचे पवार साहेब महाराष्ट्राची शान आहेत, त्यांचा कोणी हातही धरु शकत नाही”

कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका!

कोरोना लसीसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली ‘ही’ महत्वपूर्ण माहिती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या