Top News

“कुंभकर्णी निद्रित असणारं अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागं झालं”

मुंबई | राज्यातील मंदिर खुली करून देण्यासाठी भाजपकडून आंदोलनं छेडण्यात आली होती. अखेर पाडव्याच्या दिवसापासून राज्य सरकारने धार्मिक स्थळं उघडण्यास परवानगी दिलीये.

यावरून भाजपचे नेते राम कदम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. राम कदम यांनी ट्विट करत हा राज्य सरकारचा मोठा पराभव असल्याचं म्हटलंय.

राम कदम त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, कुंभकर्णी निद्रित असणारे अहंकारी महाराष्ट्र सरकार अखेर जागे झाले. डरपोक सरकारचा मोठा पराभव! जनतेचा अखेर मोठा विजय!”

राज्यातील धार्मिकस्थळ सोमवारपासून सुरू होत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. यावेळी हा फक्त सरकारी आदेश नसून ‘श्रीं ची इच्छा समजा असं त्यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार?; आमदार एनडीएत सामील होण्याची शक्यता

“किरीट सोमय्या यांच्या बोलण्याला त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे त्यांनी…”

नितीश कुमारांनी दिला राजीनामा, नेता निवडीसाठी एनडीएची उद्या बैठक

सुशांतला मी बिहारचा मानत नाही, तो मुंबईचाच- संजय राऊत

भाजपसोबत आमचा भावनिक बंध होता, 25 वर्षांचं नातं तोडताना खूप दु:ख झालं- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या