बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युनियनच्या गुंडगिरीला ‘राम कदम’ जबाबदार; राजू सापते आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचा धक्कादायक आरोप

मुंबई | प्रसिद्ध कला दिग्दर्शक राजू सापते यांनी नुकतीच आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात त्यांनी  लेबर युनियनचा पदाधिकारी राकेश मौर्य त्रास देत असल्याचं सांगितलं. काही चुक नसताना त्रास होत असल्यानं आत्महत्या करायचं ठरवलं आहे, असं त्यांनी त्यांच्या शेवटच्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता शिवसेनेने धक्कादायक आरोप केले आहेत.

फिल्म स्टुडिओज सेटिंग अँड अलाईड मजदूर युनियनमधील वाढत्या गुंडगिरीला भाजपचे आमदार राम कदम जबाबदार आहेत. त्यावेळी भाजपकडे गृहमंत्रीपद असल्यानं त्यांनी त्याचा फायदा घेत युनियनमधील गुंडांना पाठीशी घातलं होतं. त्यामुळे वारंवार तक्रार करूनही संबंधितांवर कोणतीही कारवाई झाली नाही, असा आरोप शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. पण आता या प्रकरणात राम कदम यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

मजदूर युनियन या संघटनेवर आता कोणताही संबंध नसलेल्या चांडाळ चौकडीने कब्जा केला आहे. ते युनियनच्या कुठल्याही कायद्याचे कुठलेही पालन करत नाहीत. या विरोधात वर्षभरापासून कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर यांच्याकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. 2015 साली राम कदम या युनियनचे अध्यक्ष झाले होते, तेव्हापासून हा गोंधळ सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या प्रकरणात आता मनसेनेही आक्रमक भुमिका घेतली आहे. यापुढे कोणताही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी सेटवर जाऊन त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही. ही धमकीच आहे, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ जिल्ह्यातील तब्बल 333 ग्रामपंचायती झाल्या कोरोनामुक्त

कोवॅक्सिन आणि कोविशिल्डनंतर आता भारतात ‘ही’ लस देखील मिळणार मोफत

पावसाळी अधिवेशनाची वादळी सुरुवात झाल्यानंतर आज नेमका कोणता मुद्दा गाजणार? 

‘…पण भाजपला हे मान्य आहे का?’ मोहन भागवतांचं कौतुक करत शिवसेनेचे भाजपला चिमटे

मुस्लिम आरक्षणासाठी आठवले मैदानात; आज आझाद मैदानात रिपाइंचा एल्गार

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More