बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करा, दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे”

मंबई | तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते एटीएस आणि एनआयएच्या रडारवर होते. त्यांच्या अटकेनंतर आता भाजप नेते राम कदम यांनी सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केली आहे.

सचिन वाझे यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की त्यामुळे सरकार आणि नेते अडचणीत येऊ शकतात? यासाठी सचिन वाझे यांनी नार्को टेस्ट झाली पाहिजे, असं राम कदम यांनी म्हटलं आहे. मी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहलं आहे. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. त्यामुळे सचिन वाझे यांची नार्को टेस्ट करून दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ दे. सचिन वाझे यांची नार्को टेस्ट झाली नाही तर ठाकरे सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आता भाजप आणखी आक्रमक झाला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहेत. तसेच भाजपनेही या प्रकरणावरून वाझेंवर गंभीर आरोप करत ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘…हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत’; संजय राऊतांचा ठाकरे सरकारला इशारा

पोलीस आणि प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून महसूल विभागातील एका अधिकाऱ्याची आत्महत्या

‘गरज पडल्यास संपर्क साधा’; मोबाईल नंबर देत नवऱ्याने गावात स्वत:च्याच बायकोचे लावले पोस्टर्स

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकद दाखवून देऊ; राजू शेट्टींचा सरकारला इशारा!

स्टंट करत गाडीवरच सुरू झाला रोमान्स अन्…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More